मुंबई - अभिनेत्री सनी लिओनीने एक व्हिडिओ शेअर करीत चाहत्यांना एक पर्वणीच बहाल केली आहे. शाहरुख खानच्या 'रईस' चित्रपटातील 'लैला' गाण्याची एक झलक तिने दाखवली आहे. या गाण्याच्या ठेक्यावर तिने को- डान्सर्ससोबत आपला जलवा दाखवलाय.
पाहा, सनी लिओनीचा जलवा, चाहत्यांसाठी शेअर केली व्हिडिओची पर्वणी - सनी लिओनी
सनी लिओनी सोशल मीडियावर सक्रिय असते. तिने सध्या रईस चित्रपटातील लैला गाण्याच्या रिहर्सलचा व्हिडिओ शेअर केला आहे. चाहते यावर फिदा झाल्याचे पाहायला मिळत आहे.
सनी लिओनी
इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करीत सनी लिओनीने लिहिलंय, ''लैला कोणत्या ठिकाणी परफॉर्म करणार ओळखा पाहू? या गाण्यावर डान्स करताना मला आनंद होतो.''
हा व्हिडिओ सनी लिओनीच्या रिहर्सलचा आहे. ती अनेकवेळा या गाण्यावर नाचताना दिसली आहे. आगामी इव्हेन्टच्या ती तयारीत दिसते. हा इव्हेन्ट कुठे होणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र ती ज्या ठिकाणी परफॉर्म करायला जाते तिथे तिला प्रचंड प्रतिसाद मिळतोच. आता हा डान्स ती कुठे सादर करणार आहे हे लवकरच स्पष्ट होईल.