महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'नव्या पीढीच्या प्रेमाची नवी कहानी', 'पल पल दिल के पास'चा टीजर प्रदर्शित - ब्लॅकमेल

देओल कुटुंबीयाची तिसरी पीढी आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. याचे पहिले पाऊल म्हणजे 'पल पल दिल के पास' हा चित्रपट. या टीजरमध्ये करणची रोमॅन्टिक झलक पाहायला  मिळते.

'नव्या पीढीच्या प्रेमाची नवी कहानी', 'पल पल दिल के पास'चा टीजर प्रदर्शित

By

Published : Aug 5, 2019, 4:58 PM IST

मुंबई -आजवर प्रेमाची बरीच रुपं आपल्याला बॉलिवूड चित्रपटातून पाहायला मिळाली आहेत. त्यामुळेच प्रेमाच्या नवनव्या व्याख्या या चित्रपटातून मांडण्यात आल्या आहेत. सिनेसृष्टीतून अशाच प्रेमाच्या कथा पडद्यावर साकारण्यात आल्या आहेत. अशीच एक प्रेमाची कथा घेऊन अभिनेता सनी देओलचा मुलगा करण 'पल पल दिल के पास' या चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण करत आहे. नुकताच या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित करण्यात आला.

देओल कुटुंबीयाची तिसरी पीढी आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. याचे पहिले पाऊल म्हणजे 'पल पल दिल के पास' हा चित्रपट. या टीजरमध्ये करणची रोमॅन्टिक झलक पाहायला मिळते. तर, त्याच्यासोबत साहीर बांबा ही नवोदीत अभिनेत्री देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटाचे शिर्षक धर्मेंद्र यांच्या 'ब्लॅकमेल' चित्रपटातील गाण्यावरून घेण्यात आले आहे.

सनी देओलनेच या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. लवकरच चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित करण्यात येणार आहे. मागच्या वर्षी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. या चित्रपटाचे शूटिंग हिमालयातील बर्फाळ प्रदेशात करण्यात आली आहे.

तसे पाहिले तर, देओल कुटुंब हे अॅक्शन चित्रपटासाठी ओळखले जाते. मात्र, करण हा रोमॅन्टिक चित्रपटातून पदार्पणासाठी सज्ज झाला आहे. २० सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details