महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

भाजप 'सनी देओलला आणो अथवा सनी लिओनी'ला, काँग्रेसच्या वादळासमोर टिकाव लागणार नाही - छाब्बेवाल - Sunny Leone

पंजाबमधील होशियारपूरमधून भाजपने अभिनेता सनी देओलला टिकीट दिले आहे. त्याच्या उमेद्वारीने भाजपच्या गोटात आनंद झालाय. मात्र सनी देओल तर सोडाच पण सनी लिओनी जर आली तरी काँग्रेसच्या वादळासमोर टिकाव लागणार नाही, असे मत राज कुमार छाब्बेवाल यांनी व्यक्त केलंय.

काँग्रेसच्या वादळासमोर नाही टिकाव लागणार - छाब्बेवाल

By

Published : May 3, 2019, 11:29 PM IST


गुरुदासपूर - काँग्रेसच्या वादळासमोर सनी देओल तर सोडाच पण भाजपने सनी लिओनीला उभे केले तरीही गुरुदासपूरमधून जिंकू शकणार नाहीत, असा दावा काँग्रेसचे पंजाबचे नेते राज कुमार छाब्बेवाल यांनी केला आहे. होशियारपूर लोकसभा मतदार संघातून छाब्बेवाल काँग्रेसतर्फे निवडणूक लढवीत आहेत.

राज कुमार छाब्बेवाल म्हणाले, ''मोदी सरकार अपयशी ठरले आहे. पंजाबमधील तीन जागांसाठी त्यांना उमेद्वार मिळाले नाहीत. भाजप सनी देओलला आणू दे किंवा सनी लिओनीला आणू दे , काँग्रेसच्या वादळासमोर त्यांच्या टिकाव लागणार नाही.''

सनी देओल यांनी गेल्या आठवड्यात भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्याच्या कुटुंबातील हा तिसरा व्यक्ती आहे, जो भाजपकडून निवडणूक लढवत आहे. या अगोदर सनीचे वडील धर्मेंद्र यांनी बिकानेरमधून निवडणूक लढवली होती व ते खासदारही झाले होते. सनीदेओल यांच्या सावत्र आई हेमा मालिने विद्यमान खासदार असून त्या मथूरेतून भाजपतर्फे निवडणूकीच्या रिंगणात पुन्हा उतरल्या आहेत.

सनी देओलच्या विरोधात काँग्रेसतर्फे विद्यामान खासदार सुनिल जाखड निवडणूक लढवीत आहेत. १९ तारखेला येथील मतदान पार पडेल आणि २३ मे रोजी देशातील निवडणुकीचा निकाल लागणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details