महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

सुनील ग्रोव्हरने 'द कपिल शर्मा शो'त परतण्याबद्दल सौडले मौन, चाहते मात्र नाराज - Sunil Grover revile his come back

सुनिल ग्रोव्हरने ट्विट करुन जे सांगितले त्यावरुन तो पुन्हा कपील शर्मासोबत काम करणार असाच तर्क चाहत्यांनी काढला आहे. याबद्दल सुनिलने खुलासा करीत मौन सोडले आहे..

'द कपिल शर्मा शो

By

Published : Sep 19, 2019, 10:34 PM IST


मुंबई - द कपील शर्मा शो सध्या पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या चांगल्या पसंतीस उतरतोय. या शोमधील सहकलाकार उत्तम कामगिरी करीत असले तरीही सुनिल ग्रोव्हरची अनुपस्थिती प्रेक्षकांना जाणवत असते. अशावेळी अलिकडेच त्याच्या चाहत्यांच्या आशा पल्लवीत झाल्या. सुनिल ग्रोव्हरने ट्विट करुन जे सांगितले त्यावरुन तो पुन्हा कपील शर्मसोबत काम करणार असाच तर्क चाहत्यांनी काढला.

खरंतर काही दिवसापूर्वी या ट्विटनंतर सुनिल ग्रोवेहरने एक मुलाखत दिली. यात त्याला कपील शर्मा शोमध्ये परतणार असल्याचा प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना तो म्हणाला, माझ्या ट्विटचा असा अर्थ लोक का लावत आहेत, ते मला माहिती नाही. माझ्या ट्विटमध्ये तर तसे काहीच नव्हते. या बोलण्याला काही अर्थ नाही आणि असे काही घडणार नाही. फॅन्स ट्विटवर कॉमेंट्स करतात परंतु त्या कॉमेंट्सवर तुम्ही बातमी नाही बनवू शकत.

शोबद्दल येत असलेल्या अफवांबद्दलही सुनिलने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. तो म्हणाला, हे सर्व आधारहीन आहे, यावर काही कॉमेंट करु शकत नाही. वास्तवात खूप वैताग आणणारी ही गोष्ट आहे. जर काही असे होणार असेल तर मीच त्याची माहिती देईन.

'द कपिल शर्मा शो'शी संबंधीत सूत्राने सुनिल ग्रोव्हर परतणार असल्याची ही बातमी खोडून काढली. सुनिलच्या जागी अभिषेकची वर्णी लागली आहे. त्यामुळे असे काही होणार नसल्याचेही तो म्हणाला.

ABOUT THE AUTHOR

...view details