महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

सुहाना खानच्या 'या' सेल्फीवरुन नेटकऱ्यांनी हेरली तिची 'ही' सवय, फोटो व्हायरल - srk

सुहाना लवकरच बॉलिवूड पदार्पण करणार असल्याच्या चर्चा बऱ्याच दिवसापासून रंगल्या आहेत. तिच्या फॅशन सेन्ससाठीदेखील ती ओळखली जाते. तिने तिचा आरशातला सेल्फी चाहत्यांशी शेअर केला होता.

सुहाना खानच्या 'या' सेल्फीवरुन नेटकऱ्यांनी हेरली तिची 'ही' सवय, फोटो व्हायरल

By

Published : Jun 6, 2019, 3:40 PM IST

मुंबई -किंग खान शाहरुखची मुलगी सुहाना ही बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच प्रसिद्ध झाली आहे. सोशल मीडियावरही ती बरीच सक्रिय असते. तिचे वेगवेगळे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. तिने अलिकडेच तिची एक सेल्फी सोशल मीडियावर शेअर केली होती. या फोटोची सध्या बरीच चर्चा होताना पाहायला मिळतेय.

सुहाना लवकरच बॉलिवूड पदार्पण करणार असल्याच्या चर्चा बऱ्याच दिवसापासून रंगल्या आहेत. तिच्या फॅशन सेन्ससाठीदेखील ती ओळखली जाते. तिने तिचा आरशातला सेल्फी चाहत्यांशी शेअर केला होता. या सेल्फीमध्ये तिने हातात मोबाईल घेतलेला पाहायला मिळतो. त्यासोबतच तिच्या मोबाईलच्या कव्हरमध्ये एटीएम कार्ड पाहायला मिळते. त्यामुळे सर्वसामान्य मुलींप्रमाणे सुहानाला देखील एटीएम कार्ड मोबाईच्या कव्हरमध्ये ठेवण्याची सवय आहे, असे नेटकऱ्यांनी म्हटले आहे.

सुहाना खान

सुहानाच्या या सेल्फीवर चाहत्यांनी बऱ्याच प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच तिच्या ट्रॅडिशनल लूकवरही चाहत्यांनी भरभरुन प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सुहाना खान

ABOUT THE AUTHOR

...view details