महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

Vijeta re-released : सुभाष घई यांचा मराठी चित्रपट ‘विजेता’ पुनःप्रदर्शनासाठी सज्ज! - मराठी चित्रपट ‘विजेता’

गेल्यावर्षी कोरोना महामारीच्या तडाख्यामुळे अनेक चित्रपट प्रदर्शित होऊ शकले नाहीत. लॉकडाऊनच्या थोड्या आधी प्रदर्शित झालेल्या चित्रपटांना याचा मोठा फटका बसला. परंतु ‘शो मस्ट गो ऑन’ यावर विश्वास असणारे प्रथितयश निर्माते-दिग्दर्शक ‘शोमन’ सुभाष घई (Producer-director ‘Showman’ Subhash Ghai)यांनी आपला मराठी चित्रपट ‘विजेता’ पुन्हा प्रदर्शित ( movie 'Winner' re-released)करण्याचा निर्णय घेतलाय.

मराठी चित्रपट ‘विजेता’
मराठी चित्रपट ‘विजेता’

By

Published : Nov 23, 2021, 7:13 PM IST

Updated : Nov 23, 2021, 8:30 PM IST

चित्रपटाच्या कथानकाचा आवाका मोठा असतो म्हणूनच तो मोठ्या पडद्यावर जास्त प्रभावी वाटतो. गेल्यावर्षी कोरोना महामारीच्या तडाख्यामुळे अनेक चित्रपट प्रदर्शित होऊ शकले नाहीत. लॉकडाऊनच्या थोड्या आधी प्रदर्शित झालेल्या चित्रपटांना याचा मोठा फटका बसला. परंतु ‘शो मस्ट गो ऑन’ यावर विश्वास असणारे प्रथितयश निर्माते-दिग्दर्शक ‘शोमन’ सुभाष घई (Producer-director ‘Showman’ Subhash Ghai)यांनी आपला मराठी चित्रपट ‘विजेता’ पुन्हा प्रदर्शित ( movie 'Winner' re-released)करण्याचा निर्णय घेतलाय.

खेळाची पार्श्वभूमी असलेला आणि मुक्ता आर्ट्सची निर्मिती असलेला चित्रपट ‘विजेता’ गेल्या १२ मार्च २०२० रोजी रिलीज झाला होता पण कोरोनाचा उद्रेक वाढल्याने चित्रपटाचे प्रदर्शन एका दिवसात मागे घेण्याचा निर्णय सुभाष घई यांनी घेतला. परंतु आता परिस्थिती पुन्हा पूर्व पदावर येत आहे आणि मुक्ता आर्टस् ‘विजेता’ पुन्हा रिलीज करणार आहे. सुबोध भावे, पूजा सावंत, प्रीतम कागणे, सुशांत शेलार, माधव देवचक्के, मानसी कुलकर्णी, तन्वी किशोर, देवेन्द्र चौगुले, दिप्ती धोत्रे, क्रुतिका तुलसकर,आणि गौरीश शिपुरकर या कलावंतांचा समावेश असलेला ‘विजेता’ येत्या ३ डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटाच्या कथेमध्ये आदल्या नॅशनल गेम्समध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंची कामगिरी उल्लेखनीय नसल्यामुळे, महाराष्ट्राच्या स्पोर्ट्स अकॅडेमीच्या डीन वर्षा कानविंदे (मानसी कुलकर्णी) माईंड कोच म्हणून सौमित्र देशमुख (सुबोध भावे) यांची निवड करतात. सौमित्र पुढे महाराष्ट्राला जिंकवून देणं हे त्याचं ध्येय असतं. तो सर्व खेळाडूंचे मनोबल उंचावण्याचे आणि स्पर्धा जिंकण्यासाठी प्रवृत्त करण्याचे काम करतो. त्या सर्वांमधील हरवलेला आत्मविश्वास कसा परत आणतो, त्यांना मनाच्या कुरुक्षेत्रावर जिंकायला कसं शिकवतो आणि हे सर्व करताना त्याच्या स्वतःच्या भूतकाळाला हरवून महाराष्ट्राला विजयपथावर कसा घेऊन जातो हे सर्व ‘विजेता’ मधून दिसेल.

निर्माते राहुल पुरी आणि राजू फारुकी आणि सहनिर्माते सुरेश पै यांची निर्मिती असलेल्या ‘विजेता’ चे लेखक आणि दिग्दर्शक आहेत अमोल शेटगे. याचे सिनेमॅटोग्राफर म्हणून उदयसिंह मोहिते यांनी काम बघितलं असून संकलक आशिष म्हात्रे आहेत. संगीताची बाजी रोहन रोहन यांनी सांभाळली असून यातील गाणी बरीच लोकप्रिय झालीयेत.

‘शोमन’ सुभाष घई यांचा मराठी चित्रपट ‘विजेता’ पुनःप्रदर्शनासाठी सज्ज झाला असून येत्या ३ डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात सिनेमागृहांत प्रदर्शित होईल.

हेही वाचा - सध्या मी दिग्दर्शन सुट्टी घेतली असून अभिनयावर लक्ष केंद्रित केले आहे दिव्या खोसला कुमार

Last Updated : Nov 23, 2021, 8:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details