महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

विद्यार्थिनीने गाण्यातून केली कोरोनाविषयक जनजागृती

छत्तीसगड येथील दहावीची परिक्षा दिलेल्या विद्यार्थिनीने देखील एका गाण्याद्वारे कोरोनाविषयक जनजागृती केली आहे. स्तुती जयस्वाल असे या विद्यार्थिनीचे नाव आहे.

stuti-jaiswal-and-her-father-made-a-song-on-corona-in-sarguja
विद्यार्थिनीने गाण्यातून केली कोरोनाविषयक जनजागृती

By

Published : Apr 10, 2020, 3:42 PM IST

सरगुजा - कोरोना विषाणूविषयक जनजागृती करण्यासाठी आत्तापर्यंत अनेक कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आले आहेत. गाण्याद्वारे नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी अनेकांनी गीतांचा वापर केला आहे. छत्तीसगड येथील दहावीची परिक्षा दिलेल्या विद्यार्थिनीने देखील एका गाण्याद्वारे कोरोनाविषयक जनजागृती केली आहे. स्तुती जयस्वाल असे या विद्यार्थिनीचे नाव आहे.

विद्यार्थिनीने गाण्यातून केली कोरोनाविषयक जनजागृती

वडिलांकडून मिळाली प्रेरणा -

स्तुती जयस्वाल हिला बालपणापासूनच गायनाची आवड आहे. आपल्या वडिलांकडून नेहमीच आपल्याला गायनाची प्रेरणा मिळाली असल्याचे स्तुतीने सांगितले आहे. तिने दोन रिअॅलिटी शोमध्ये देखील सहभाग घेतला आहे.

आपल्या गाण्यातून तिने ग्रामीण भागातील लोकांपर्यंत पोहचता यावे, यासाठी छत्तीसगडी शैलीतच गाणे गायले आहे. यातून तिने नागरिकांना खबरदारी बाळगण्याचे आवाहनही केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details