मुंबई -प्रजासत्ताक दिनानिमित्त वरुण धवनच्या 'स्ट्रीट डान्सर' या चित्रपटातील नवं गाणं प्रदर्शित करण्यात आले आहे. हे गाणे जवानांना समर्पित करण्यात आले आहे. मागच्या वर्षी वाघा बॉर्डरवर या गाण्याचे शूटिंग करण्यात आले होते. यावेळी वरुणने जवानांसोबतही डान्स केला होता.
'हम हिंदुस्थानी' या गाण्याचं हे रिक्रियेटेड व्हर्जन आहे. शंकर महादेवन आणि उदित नारायण यांनी हे गाणं गायलं आहे. तर, हर्ष उपाध्याय यांनी या गाण्याला रिक्रियेट केलं आहे. विशेष म्हणजे एकाच टेकमध्ये या गाण्याचं शूटिंग पूर्ण झालं होतं.
'स्ट्रीट डान्सर' हा चित्रपट २४ जानेवारीला प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील इतर गाणीही सोशल मीडियावर हिट ठरली आहेत. तर, बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
हेही वाचा -'स्ट्रीट डान्सर' Vs 'पंगा' : जाणून घ्या पहिल्या दिवशीची कमाई
श्रद्धा कपूर, प्रभू देवा आणि नोरा फतेही यांच्यासोबत बऱ्याच डान्सर कलाकारांच्या यामध्ये भूमिका आहेत. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने १०.२४ कोटीची दमदार ओपनिंग केली आहे. यामध्ये दुसऱ्या दिवशीदेखील वाढ झाली आहे. दुसऱ्या दिवशी १३.२१ कोटीची कमाई करत या चित्रपटाने दोनच दिवसात २३.४७ कोटींचा गल्ला जमवला आहे. आठवड्याच्या शेवटीदेखील या चित्रपटाच्या कमाईत भर पडण्याची शक्यता आहे.