मुंबई - रेमो डिसूजाचं दिग्दर्शन असलेला 'स्ट्रीट डान्सर' आणि अश्विनी अय्यर तिवारीचे दिग्दर्शन असलेला 'पंगा' हे दोन चित्रपट २४ जानेवारीला प्रदर्शित झाले आहेत. दोन्हीही चित्रपटांच्या टीमने आपल्या चित्रपटांचे दमदार प्रमोशन केले होते. या चित्रपटांच्या ट्रेलरलाही सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी या चित्रपटांमध्ये चांगलीच शर्यत पाहायला मिळाली.
चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी या दोन्ही चित्रपटाच्या पहिल्या दिवशीच्या कमाईच्या आकड्यांबाबत माहिती दिली आहे. यामध्ये कंगना रनौतच्या 'पंगा' चित्रपटाच्या तुलनेत 'स्ट्रीट डान्सर'ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
हेही वाचा -३५० चित्रपटात रांगडी भूमिका करणाऱ्या या खलनायकाला ओळखलंत का?