महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'स्ट्रीट डान्सर थ्रीडी'चं नवं गाणं 'दुआ करो' - स्ट्रीट डान्सर चित्रपटातील गाणी

या गाण्यात वरुण आणि इतर डान्सरची दमदार झलक पाहायला मिळते.

Street Dancer 3D new song Dua Karo out
'स्ट्रीट डान्सर थ्रीडी'चं नवं गाणं 'दुआ करो'

By

Published : Jan 10, 2020, 8:50 AM IST

मुंबई -अभिनेता वरुण धवन आणि श्रद्धा कपूर यांची जोडी असलेला 'स्ट्रीट डान्सर' चित्रपटातील ट्रेलरला सध्या प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटातील गाणी देखील सोशल मीडियावर हिट होत आहेत. अलीकडेच या चित्रपटातील नवं गाणं 'दुआ करो' प्रदर्शित झालं आहे. या गाण्याला अरिजीत सिंगने आवाज दिला आहे.

श्रद्धा कपूर आणि वरूण धवन यांनी या गाण्याची क्लिप आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली आहे. 'स्ट्रीट डान्सरच्या आयुष्याची लय आणि आत्मा असलेलं दुआ करो गाणं', असं कॅप्शन त्यांनी या गाण्याला दिलं आहे.

हेही वाचा -हॅप्पी बर्थडे हृतिक रोशन : डान्स मुव्ह्जचा जादूगर

या गाण्यात वरुण आणि इतर डान्सरची दमदार झलक पाहायला मिळते. सोशल मीडियावर चाहत्यांनीही या गाण्याला प्रतिक्रिया दिल्या आहेत.
सचिन जिगर आणि बोहेमिया यांनी हे गाणं कंपोज केले आहे.

रेमो डिसूझाचं दिग्दर्शन असलेला 'स्ट्रीट डान्सर' चित्रपट २४ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हेही वाचा -नव्या वर्षात राणादा,अंजलीबाईंचा नव्या वास्तुत प्रवेश, वसगडे ऐवजी केर्लीत होतंय शूटींग

ABOUT THE AUTHOR

...view details