महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

“स्टोरी ऑफ लागीरं" चित्रपटाचं पोस्टर झालं लाँच, संजय खापरे दिसणार महत्त्वपूर्ण भूमिकेत!

‘स्टोरी ऑफ लागीरं’ ज्याच्या पोस्टरचं नुकतंच अनावरण करण्यात आलं. रॉयल समृद्धी असोसिएट्स आणि स्वरुप वैशाली बाळासाहेब सावंत प्रस्तुतकर्ते असून जी. के. फिल्म्स क्रिएशसनं निर्मिती केली आहे. बी. एन. मेश्राम चित्रपटाचे निर्माते, यामिनी वाघडे सहनिर्मात्या आहेत. रोहित राव नरसिंगे यानी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. मंगेश गाडेकर यांनी छायांकन, सनी-सुशांत आणि अतुल जोशी यांनी संगीत, निहार राजहंस, बी. गोपानारायण यांनी गीतलेखन, मीडिया वर्क्स स्टुडिओने पोस्ट प्रॉडक्शनची जबाबदारी निभावली आहे.

स्टोरी ऑफ लागीरं
स्टोरी ऑफ लागीरं

By

Published : Dec 20, 2021, 10:44 PM IST

ओमायक्रॉनच्या बागुलबुवाला न घाबरता मनोरंजनसृष्टी वेगाने मार्गक्रमण करतेय. अनेक नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत, त्यातीलच एक म्हणजे ‘स्टोरी ऑफ लागीरं’ ज्याच्या पोस्टरचं नुकतंच अनावरण करण्यात आलं. रॉयल समृद्धी असोसिएट्स आणि स्वरुप वैशाली बाळासाहेब सावंत प्रस्तुतकर्ते असून जी. के. फिल्म्स क्रिएशसनं निर्मिती केली आहे. बी. एन. मेश्राम चित्रपटाचे निर्माते, यामिनी वाघडे सहनिर्मात्या आहेत. रोहित राव नरसिंगे यानी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. मंगेश गाडेकर यांनी छायांकन, सनी-सुशांत आणि अतुल जोशी यांनी संगीत, निहार राजहंस, बी. गोपानारायण यांनी गीतलेखन, मीडिया वर्क्स स्टुडिओने पोस्ट प्रॉडक्शनची जबाबदारी निभावली आहे.

स्टोरी ऑफ लागीरं

स्टोरी ऑफ लागीरं या नावावरून हा चित्रपट एका गावाच्या पार्श्वभूमीवर घडणारा, त्यासोबतच चित्रपटाच्या केंद्रस्थानी प्रेमकथा, राजकारण असल्याचा अंदाज बांधता येतो. रोहित राव नरसिंगे, चैताली चव्हाण, ऋतुजा अंद्रे, मोहन जाधव, सोमनाथ येलनूरे यांच्यासह संजय खापरे, मिलिंद दास्ताने, प्रेमाकिरण असे अनुभवी कलाकारही आहेत. विनोदी आणि गंभीर भूमिकांमध्ये तितक्याच सहजतेनं वावरणारा अभिनेता संजय खापरे ‘स्टोरी ऑफ लागीरं’ या चित्रपटात पोलिसाच्या महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. यात रोहित राव नरसिंगे, चैताली चव्हाण, ऋतुजा अंद्रे हे नव्या दमाच्या कलाकारांचं या चित्रपटातून पदार्पण होत आहे.

येत्या १४ जानेवारीला ‘स्टोरी ऑफ लागीरं’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हेही वाचा - ठग सुकेश चंद्रशेखरने जॅकलिनला दिले होते 500 कोटी बजेटच्या चित्रपटाचे वचन

ABOUT THE AUTHOR

...view details