हैदराबाद: राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट निर्माता नाग अश्विनने आपल्या आगामी बहुभाषिक चित्रपटासाठी स्वप्नवत कास्ट निष्चित केली आहे. अश्विनच्या आगामी चित्रपटात मेगास्टार अमिताभ बच्चन, पॅन-इंडिया स्टार प्रभास आणि पॉवरहाऊस प्रतिभा दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. पण कलाकारांपेक्षा कथेमुळे अश्विन जास्त उत्साहित असल्याचे सांगतो.
पिट्टा कथालू या तेलुगु कथा वाचनातून नाग अश्विन यांनी चित्रपट निर्माते थरुन भास्कर, बी.व्ही. नंदिनी रेड्डी आणि संकल्प रेड्डी यांच्याशी या चित्रपटाच्या कथेबद्दल संवाद साधला. पिट्टा कथालूच्या प्रमोशन दरम्यान नाग अश्विनला विचारले गेले होते की प्रभास, दीपिका आणि बिग बी यांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटात या कलाकारांचा अभिनय कसा असेल? आपल्याकडे जी कथा आहे त्यात हे कलावंत भूमिका करणार आहेत ही गोष्ट जास्त रोमांचक वाटते असे नाग अश्विन म्हणाले.