अमरावती -महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने अमरावतीत एकूण ६० वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे रंगलेल्या या नाट्यस्पर्धेला अमरावतीकर रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. गुरुवारी (१२ डिसेंबर) सकाळी वैष्णवी महिला आणि आदिवासी विकास संस्थेच्या वतीने सादर करण्यात आलेले यतीन माझीरे लिखित 'आता पास' या कौटुंबिक नाटकाने प्रेक्षकांचे डोळे पाणावले.
५ डिसेंबरला 'कॉफिन' या नाटकाने या स्पर्धेला सुरुवात झाली. पु ल देशपांडे यांचे 'सुंदर मी होणार' हे नाटक भोपाळच्या मध्य प्रदेश मराठी साहित्य संघाने १० डिसेंबरला सादर केले. या नाटकानेही अमरावतीकरांची वाहवा मिळवली. कलादर्पण बहुउद्देशीय संस्था अमरावतीच्या वतीने अशोक काळे लिखित 'वेटिंग फॉर' या नाटकाने प्रेक्षकांना थक्क करून सोडले. यामध्ये रेल्वे स्थानकावरील वेटिंग रूम मध्ये घडणाऱ्या घटना आणि त्याद्वारे एखाद्याच्या आयुष्याला कशाप्रकारे कलाटणी मिळते, हे पाहायला मिळाले.
हेही वाचा -तुमच्यात अभिनयाचा किडा वळवळतोय? तर तुमच्याचसाठी परत येतोय 'महाराष्ट्राचा सुपरस्टार'