मुंबई - बॉलिवूडचा 'बादशाह' शाहरुख खान 'झिरो' चित्रपटानंतर कोणत्याही चित्रपटात झळकला नाही. त्याने आत्तापर्यंत कोणत्या चित्रपटाची घोषणाही केलेली नाही. त्यामुळे त्याच्या चित्रपटासाठी चाहत्यांमध्ये मोठी आतुरता पाहायला मिळते. सोशल मीडियावर विविध हॅशटॅग वापरून शाहरुखला चित्रपटाच्या घोषणेसाठी मागणीही करण्यात येत आहे. त्यामुळे शाहरुखच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता शाहरुख एक नाही, तर दोन चित्रपटांची घोषणा करणार आहे.
होय, शाहरुखचा २ नोव्हेंबरला ५४ वा वाढदिवस आहे. एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, शाहरुख त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी आपल्या आगामी चित्रपटांची घोषणा करणार आहे. दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांच्या चित्रपटामध्ये तो भूमिका साकारणार असल्याचं वृत्त समोर येत आहे. तर, एस. शंकर यांच्याही एका चित्रपटात त्याची वर्णी लागली आहे.