मुंबई -बॉलिवूडचा किंग शाहरुख खान बऱ्याच दिवसांपासून चित्रपटांपासून लांब आहे. त्याच्या 'झिरो' चित्रपटाच्या अपयशानंतर तो कोणत्याही चित्रपटात झळकला नाही. आगामी चित्रपटाची घोषणाही त्याने केली नाही. त्यामुळे शाहरुखला पडद्यावर पाहण्यासाठी त्याचे चाहते आतुर झाले आहेत. मात्र, आता शाहरुख त्याच्या चाहत्यांना लवकरच सरप्राईझ देणार आहे. लवकरच तो त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा करणार आहे.
मुंबईत आयोजित एका कार्यक्रमामध्ये शाहरुखने अलिकडेच हजेरी लावली होती. या कार्यक्रमात त्याने आगामी चित्रपटाची घोषणा कधी करणार ते सांगितले.
हेही वाचा- इतकी सुंदर होती कंगनाची बहिण, अॅसिड हल्ल्यानंतर बदललं रुप