मुंबई -बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि दिग्दर्शक करण जोहर हे एकमेकांचे अगदी जवळचे मित्र आहेत. वर्षानुवर्षापासून ते आपली मैत्री जपत आले आहेत. शाहरुखचे करण जोहरसोबतचे सर्वच चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. त्यामुळे दोघांच्याही मैत्रीचं खास गणीत जुळून येतं. अशातच करणने शाहरुखला एक खास भेटवस्तु दिली आहे. शाहरुखने सोशल मीडियावर फोटो शेअर करुन करणचे आभार मानले आहेत.
करणने शाहरुखला एक खास जॅकेट भेटवस्तू म्हणून दिलं आहे. शाहरुखला हे जॅकेट इतकं आवडलं, की त्याने हे जॅकेट घालून फोटोदेखील काढले आहेत.
हेही वाचा -'पहला वोट पहला प्यार', धमाल रॅपच्या माध्यमातून मुंबईच्या रॅपर्सचं मतदानासाठी आवाहन
'करणच्या फॅशनसेन्सला मी कधीही मॅच करू शकत नाही. मात्र, मी नेहमीच प्रयत्न करत असतो', असे लिहून त्याने ट्विटरवर पोस्ट शेअर केली आहे.
शाहरुखचा वाढदिवसही काही दिवसांवरच आला आहे. त्यामुळे त्याच्यासाठी करणची ही भेट खास ठरली आहे. त्याच्या चाहत्यांसाठीही तो खास सरप्राईझ घेऊन येणार असल्याचं बोललं जात आहे.
त्याच्या चित्रपटाची चाहत्यांना बऱ्याच दिवसापासून आतुरता आहे. मात्र, शाहरुखने अद्याप कोणत्याही चित्रपटाची घोषणा केली नाही. आता त्याच्या वाढदिवशी चाहत्यांना तो काय सरप्राईझ देतो, याची उत्सुकता लागली आहे.
हेही वाचा -गांधी @150 : बॉलिवूड कलाकारांनी सांगितले महात्मा गांधीचे विचार, पंतप्रधान मोदींची घेतली भेट