मुंबई -बॉलिवूडचा किंग शाहरुख खानची जगभरात फॅन फोलोविंग पाहायला मिळते. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर असतात. मात्र, शाहरुख स्वत: एका हॉलिवूड सुपरस्टारचा जबरा फॅन आहे. अलिकडेच त्याने आपल्या या 'हिरो'ची भेट घेतली. त्यांच्यासोबतचा फोटो शेअर करुन त्याने सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
शाहरुखने काही दिवसांपूर्वीच सौदी अरब येथील एका कार्यक्रमात सहभाग घेतला होता. जॉय फोरमच्या दोन दिवसीय महोत्सवात बऱ्याच आंतरराष्ट्रीय कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी जीन क्लाऊड, जॅकी चॅन यांसारख्या सुपरस्टार्सचीही उपस्थिती होती. यामध्ये जीन क्लाऊड वान डॅम हा एक लोकप्रिय अभिनेता आणि दिग्दर्शक आहे.
हेही वाचा -'वॉर' चित्रपटाची विदेशातही क्रेझ, हृतिकच्या 'या' चित्रपटांचा मोडला रेकॉर्ड