महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'बिग बीं'पेक्षा मोठी आहे शाहरुखची फॅन फोलोविंग, किंग खानने 'असे' मानले आभार - #SRK39MILLION

फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम या सर्व माध्यमातून शाहरुखचे अपडेट्स त्याच्या चाहत्यांना मिळत असतात. त्याच्याबद्दल जाणून घेण्यासाठी सोशल मीडियावर त्याला बरेच चाहते फॉलोही करतात.

'बिग बीं'पेक्षा मोठी आहे शाहरुखची शाहरुखची फॅन फोलोविंग, किंग खानने 'असे' मानले आभार

By

Published : Oct 15, 2019, 10:27 AM IST

मुंबई -बॉलिवूडचा 'किंग' शाहरुख खानची जगभरात तुफान लोकप्रियता पाहायला मिळते. बऱ्याच दिवसांपासून त्याच्या चित्रपटासाठी शाहरुखचे चाहते आतुर झाले आहेत. छोट्या पडद्यावरून शाहरुख प्रेक्षकांच्या भेटीलाही येतोय. सोशल मीडियावरही त्याच्या चाहत्यांची संख्या प्रचंड आहे. यामध्ये आता आणखी वाढ झाली आहे. चाहत्यांचं हे प्रेम पाहुन शाहरुखने सर्वांचे आभार मानले आहेत.

फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम या सर्व माध्यमातून शाहरुखचे अपडेट्स त्याच्या चाहत्यांना मिळत असतात. त्याच्याबद्दल जाणून घेण्यासाठी सोशल मीडियावर त्याला बरेच चाहते फॉलोही करतात. ट्विटरवर त्याच्या फोलोअर्सची संख्या ही तब्बल ३९ मिलियनच्या घरात पोहोचली आहे. त्यामुळे शाहरुखने हा आनंद सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हेही वाचा -आलिया - रणबीरच्या नात्यावर काय म्हणाली करिना?

'असंच प्रेम करत राहा. सकारात्मकता द्विगुणीत करा. स्वत:ला नेहमी आनंदी ठेवा', असा संदेशही त्याने आपल्या ट्विटमधुन दिला आहे. ट्विटरवर #SRK39MILLION हा हॅशटॅगही ट्रेण्ड झाला होता. ट्विटरवर सर्वाधिक ट्रेण्ड होणाऱ्या अभिनेत्याच्या यादीत शाहरुखच्या नावाचा समावेश झाला आहे. अमिताभ बच्चन यांच्या मायक्रोब्लॉगिंग साईटवर त्यांची फॅन फोलोविंग ही ३८.८ मिलियन इतकी आहे. त्यांच्या फॅन फोलोविंगच्या संख्येला मागे टाकत शाहरुख पुन्हा एकदा किंग ठरला आहे.

हेही वाचा -चांगली अभिनेत्री बनण्यासाठी श्रीदेवींच्या 'या' टीप्स फॉलो करते जान्हवी

ABOUT THE AUTHOR

...view details