मुंबई - बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान बऱ्याच काळापासून मोठ्या पडद्यापासून लांब आहे. त्याच्या 'झिरो' चित्रपटानंतर त्याचा एकही चित्रपट प्रदर्शित झाला नाही. शिवाय त्याने कोणत्याही चित्रपटाची घोषणा देखील केली नाही. त्यामुळे त्याला पडद्यावर पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. त्यामुळे ट्विटरवरुन #WeWantAnnouncementSRK हा हॅशटॅग वापरुन शाहरुखचे चाहते त्याला लवकरात लवकर चित्रपट साईन करण्याची मागणी करत आहेत.
ट्विटरवर सध्या #WeWantAnnouncementSRK हा हॅशटॅग खूप ट्रेण्ड होत आहे. हा हॅशटॅग वापरुन चाहते शाहरुखच्या चित्रपटाची मागणी करत आहेत. असं असलं तरीही शाहरुखने अद्याप कोणत्याही चित्रपटाची घोषणा केलेली नाही.
हेही वाचा-१ कोटीच्या प्रश्नाने होणार 'केबीसी'ची सुरूवात, १९ वर्षाचा हिंमाशु होणार का करोडपती?
शाहरुखच्या 'झिरो' चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर फारसे यश मिळाले नाही. त्यानंतर त्याने पडद्यापासून लांब राहणंच पसंत केलं. मध्यंतरी तो लवकरच चित्रपटात झळकणार असल्याचं वृत्त समोर आलं होतं. मात्र, शाहरुखनं स्वत: कोणताही चित्रपट साईन केला नसल्याचं ट्विट करुन स्पष्ट केलं होतं. त्यानंतर त्याच्या चाहत्यांनी ट्विटरवर त्याच्या पुनरागमनासाठी हॅशटॅग वापरुन मागणी केली आहे. यापूर्वी देखील त्याच्या चित्रपटासाठी चाहत्यांनी एक हॅशटॅग वापरला होता.
हेही वाचा -आयुष्मान-भूमीच्या चाहत्यांची चंगळ, 'शुभमंगल ज्यादा सावधान'चा झाला मुहूर्त
मोठ्या पडद्यापासून जरी शाहरुख लांब असला, तरीही डिजीटल माध्यमातून त्याच्या निर्मितीखाली तयार झालेली 'बार्ड ऑफ ब्लड' ही वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. शाहरुखने देखील एक प्रोमो शेअर केला होता.