मुंबई -बॉलिवूडचा 'बादशाह' शाहरुख खानचे भारतातच नाही, तर जगभरात कोट्यवधी चाहते आहेत. त्याच्या एका छबीसाठी हे चाहते जीवाचे रान करत असतात. त्याच्या याच लोकप्रियतेची झलक चीनच्या विमानतळावरही पाहायला मिळाली.
अलिकडेच शाहरुखचा 'झिरो' चित्रपटाची बीजिंगच्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये वर्णी लागली आहे. या चित्रपटाला भारतात जरी प्रेक्षकांची पसंती मिळाली नाही, तरीही चीनमधील प्रेक्षकांवर या चित्रपटाची छाप पडली आहे. त्यामुळे या फेस्टिव्हलमध्ये उपस्थित राहण्यासाठी तो चीनला रवाना झाला होता. येथे तो विमानतळावर पोहोचताच चाहत्यांच्या गराड्याने त्याला घेरले. त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी काहीजण प्रयत्नही करत होते.