मुंबई - बॉलिवूडचा किंग खान शाहरुखची मुलगी सुहाना हिच्या बॉलिवूड पदापर्णाच्या चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू होत्या. अलिकडेच सुहानाने तिचं शिक्षणही पूर्ण केलं आहे. न्यूयॉर्कमध्ये आता ती अभिनयाचे धडे गिरवत आहे. यासोबतच तिचा अभिनयातही डेब्यू झाला आहे. एका लघुपटामध्ये ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या लघुपटाचा टीझरही प्रदर्शित करण्यात आला आहे.
'द ग्रे पार्ट ऑफ ब्ल्यू' असं या लघुचित्रपटाचं नाव आहे. काही दिवसांपूर्वीच सुहानाचा या चित्रपटातील पहिला लूक प्रदर्शित करण्यात आला होता. तसंच, पहिलं पोस्टरही तिने शेअर केलं होतं. आता तिने तिच्या इन्स्टाग्राम पेजवर या लघुचित्रपटाचा टीझरही शेअर केला आहे. या टीझरमध्ये तिच्या अभिनयाची झलक पाहायला मिळते. Theodone Gimeno हे चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.