मुंबई -बॉलिवूडचा 'किंग', 'बादशाह' या नावाने ओळखला जाणारा शाहरुख खान बऱ्याच दिवसांपासून चित्रपटांपासून लांब आहे. मोठ्या पडद्यावर जरी तो दिसत नसला, तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून तो चाहत्यांशी संवाद साधत असतो. अलिकडेच त्याने #AskSRK या टॅगद्वारे चाहत्यांसोबत गप्पा मारल्या. यापैकी काही चाहत्यांच्या प्रश्नांवर शाहरुखने दिलेल्या उत्तरांमुळे त्याची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
शाहरुखचा 'झिरो' चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला. प्रेक्षकांनी या चित्रपटावर बऱ्याच संमिश्र प्रतिक्रिया दिल्या होत्या. त्यानंतर शाहरुखने आपल्या कोणत्याच आगामी चित्रपटाची घोषणा केली नाही. त्यामुळे #AskSRK च्या माध्यमातून एका युजरने शाहरुखला नेमका यासंबधीच प्रश्न विचारला.