महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

रहस्यमय 'विक्की वेलींगकर' चित्रपटात कशी आहे स्पृहा जोशीची भूमिका? - विक्की वेलींगकर चित्रपट

'विक्की वेलिंगकर' हा मराठी चित्रपट ६ डिसेंबर २०१९ ला होणार प्रदर्शित होणार आहे. स्पृहाचं पोस्टर प्रदर्शित करुन त्यावर ‘ती विक्कीला वाचवू शकेल?' या आशयाची टॅगलाईन दिली आहे. त्यामुळे या चित्रपटाबद्दलची उत्कंठा आणखी वाढली आहे.

रहस्यमय 'विक्की वेलींगकर' चित्रपटात कशी आहे स्पृहा जोशीची भूमिका?

By

Published : Oct 19, 2019, 9:41 AM IST

मुंबई -मराठीमध्ये आजवर बरेच रहस्यमय चित्रपट तयार झाले आहेत. प्रेक्षकांनाही या चित्रपटांबद्दल उत्कंठा असते. मराठीमध्ये पहिल्यांदाच 'मास्क मॅन' लूक असलेला प्रयोग आगामी 'विक्की वेलींगकर' या चित्रपटाच्या निमित्ताने झाला आहे. या चित्रपटात अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची मुख्य भूमिका आहे. मात्र, 'मास्क मॅन'च्या मागे कोणाचा चेहरा दडलेला आहे, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. अशातच आता अभिनेत्री स्पृहा जोशीचाही लूक समोर आला आहे. या चित्रपटात ती देखील महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.

'विक्की वेलिंगकर' हा मराठी चित्रपट ६ डिसेंबर २०१९ ला होणार प्रदर्शित होणार आहे. स्पृहाचं पोस्टर प्रदर्शित करुन त्यावर ‘ती विक्कीला वाचवू शकेल?' या आशयाची टॅगलाईन दिली आहे. त्यामुळे या चित्रपटाबद्दलची उत्कंठा आणखी वाढली आहे.

हेही वाचा - 'बॉईज'ना टक्कर द्यायला सिल्व्हर स्क्रीनवर 'गर्ल्स'ची एन्ट्री, टीझर प्रदर्शित

हा चित्रपट कॉमिक पुस्तकातील व्यक्तिरेखा आहे. विक्की यामध्ये घड्याळ विक्रेता आहे. आयुष्यातील एका अनपेक्षित अशा गूढतेशी या व्यक्तिरेखेचा सामना होतो. या चित्रपटाची नायिका ही आपल्या सर्व आव्हानांवर आणि अडचणींवर मात करत खंबीरपणे उभे राहते, तिची ही कथा आहे.

स्पृहा जोशी

स्पृहा जोशी या चित्रपटामध्ये विद्या नावाचे पात्र साकारत आहे. या चित्रपटात स्पृहाची भूमिका नेमकी काय आहे हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना ६ डिसेंबरपर्यंत वाट पाहावी लागेल' अस दिग्दर्शक सौरभ वर्मा यांचं सांगणं आहे.

हेही वाचा - 'अग्निहोत्र'च्या मालिकेत कोणतं रहस्य असणार? दुसरा भाग पुन्हा 'स्टार प्रवाह'वर

सौरभ यांनी यापूर्वी ‘मिकी व्हायरस’ आणि ‘७ अवर्स टू गो’ यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्यांचा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details