लॉस एंजलिस - चित्रपट निर्माता स्पाईक ली यांनी दिग्दर्शक आणि मित्र वूडी एलन यांचा बचाव करण्यासाठी हॉलिवूडमधील कॅन्सल कल्चरला विरोध केल्याबद्दल माफी मागितली. ऐलन यांना पाठिंबा देण्याचे आपले वाक्य मागे घेतल्याचे त्यांनी ट्विटरवर सांगितले. शनिवारी त्यांनी ट्विट करत याबद्दल स्पष्टीकरण दिले.
"मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. माझे शब्द चुकीचे होते. मी लैंगिक छळ, प्राणघातक हल्ला किंवा हिंसाचार याला पाठिंबा देऊ शकत नाही. अशा प्रकारच्या गोष्टींमुळे व्यक्तीचे खूप मोठे नुकसान होते. जे कधीच भरुन काढले जाऊ शकत नाही, असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं.
एका रेडिओला दिलेल्या मुलाखतीत ली म्हणाले होते, वूडी एक उत्तम व्यक्ती आणि उत्तम चित्रपट निर्माता आहे. तो माझा उत्तम मित्र आहे आणि सध्या तो या सर्व गोष्टींतून जात आहे. याची मला खात्री आहे. वूडी यांच्यावर त्यांच्या दत्तक मुलीने लैंगिक अत्याचाराचा आरोप केला होता. यावरुनच या प्रकरणाला सुरुवात झाली.
एलिन यांच्यावर त्यांची मुलगी सात वर्षांची असतानाचा तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे सर्व आरोप त्यांनी फेटाळले आहेत. याच प्रकरणामुळे एलिन यांचा मेमोइर सिनेमा अनेक पब्लिशरनं रिजेक्ट केला होता. अॅमेझॉननेही त्यांच्यासोबतची मुव्ही डील रद्द केली आहे.