मुंबई - बहुचर्चित 'स्पाइडर-मॅन : नो वे होम' हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी या चित्रपटाने केली आहे. पहिल्या विकेंडला चार दिवसात एकूण 108. 37 कोटींची कमाई सिनेमाने केली आहे.
स्पाइडर-मॅन : नो वे होम' चित्रपटाने पहिल्या दिवशी गुरुवारी 32.67 कोटी, दुसऱ्या दिवशी शुक्रवारी 20.37 कोटी, तिसऱ्या दिवशी शनिवारी 26. 10 कोटी व चौथ्या दिवशी रविवारी चित्रपटाने 29. 23 कोटीची कमाई केली. अशा प्रकारे पहिल्या चार दिवसाच्या विस्तारित विकेंडला एकूण 138. 55 कोटींची कमाई सिनेमाने केली आहे.
स्पायडर-मॅनची ओळख 2019 च्या 'स्पायडर-मॅन: फार फ्रॉम होम' चित्रपटाच्या शेवटी उघड झाली होती. स्पायडरमॅन कोण आहे हे संपूर्ण जगाला माहीत आहे. पीटर पार्कर (स्पायडर-मॅन) डॉक्टर स्ट्रेंजची मदत घेतो. अभिनेता बेनेडिक्ट कंबरबॅचने मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्समध्ये डॉक्टर स्ट्रेंजची भूमिका केली आहे. डॉक्टर स्ट्रेंजच्या जादूने मल्टीवर्स उघडले आणि 2002 च्या 'स्पायडर-मॅन' खलनायक ग्रीन गोब्लिनसह मागील 'स्पायडर-मॅन' फ्रँचायझीमधील खलनायकांना या विश्वात आणले.