महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

माधुरीच्या '१५ ऑगस्ट' सिनेमाचं खास स्क्रीनिंग, 'या' कलाकारांनी लावली हजेरी - marathi film

माधुरीने या सिनेमाची निर्मिती केली असून हा सिनेमा नेटफिलिक्स या डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्याचा निर्णय तिने घेतला आहे

१५ ऑग्सट चित्रपटांच स्क्रिनिंग

By

Published : Mar 29, 2019, 8:05 AM IST

Updated : Mar 29, 2019, 9:03 AM IST

मुंबई- माधुरी दीक्षित आणि तिचे पती श्रीराम नेने यांची निर्मिती असलेल्या १५ ऑगस्ट या मराठी सिनेमाचं खास स्क्रीनिंग गुरूवारी मुंबईतील जुहूमध्ये पार पडलं. माधुरीने या सिनेमाची निर्मिती केली असून हा सिनेमा नेटफिलिक्स या डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्याचा निर्णय तिने घेतला आहे. एकाच वेळी अनेक देशांत विखुरलेल्या मराठी माणसांपर्यंत हा सिनेमा पोहोचवण्यासाठी तिने हा निर्णय घेतला आहे.

१५ ऑग्सट चित्रपटांच स्क्रिनिंग


मराठी सिनेमे जेमतेम ४०० चित्रपटगृहांत रिलीज करण्यापेक्षा नेटफलिक्सच्या माध्यमातून एकाच वेळी १३९ देशामध्ये रिलीज करता येत असल्याने या माध्यमाची निवड केल्याचं तिने सांगितलं. विशेष म्हणजे या खास स्क्रीनिंगला ज्येष्ठ गायिका आशा भोसले उपस्थित राहिल्या. या सिनेमातून एका चाळीत १५ ऑगस्टच्या दिवशी घडणारी गोष्ट दाखवण्यात आली आहे. वैभव मांगले, मृण्मयी देशपांडे, जयवंत वाडकर, दिलीप जोशी, अरुण होरणेकर यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका आहेत. तर अर्चित जयकर यांनी या सिनेमाच दिग्दर्शन केले आहे.

गुरूवारी पार पडलेल्या खास स्क्रीनिंगला विक्रम फडणीस, अदिती गोवित्रीकर, उमेश कामत, सचिन पिळगावकर, महेश कोठारे, आदिनाथ कोठारे, उर्मिला कोठारे, स्नेहा वाघ, अनिकेत विश्वासराव, मिता सावरकर हे मान्यवर पाहुणे उपस्थित होते. या सगळ्यांनीच १५ ऑगस्ट सिनेमाच्या टीमला भरभरून शुभेच्छा दिल्या.

Last Updated : Mar 29, 2019, 9:03 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details