आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर 'देवी' हा मराठी लघुपट यूट्यूबवर रिलीज करण्यात आला आहे. जगभरातील अनेक फिल्म फेस्टीव्हलमध्ये नावाजलेला हा चित्रपट आजच्या सामाजिक परिस्थितीवर भाष्य करतो. या लघुपटाचे लेखक आणि दिग्दर्शक नीरज नारकर यांच्याशी याबाबत खास बातचीत केली.
दिग्दर्शक, लेखक नीरज नारकर लघुपट 'देवी' 'देवी' लघुपटामध्ये एक पुजारी त्याचा पौगंडावस्थेतला मुलगा, एक तरुणी आणि 'देवी' या चार पात्रांभोवती फिरते. आज श्रध्दा आणि श्रध्देचा अतिरेक या विषयाभोवती समाज फिरत आहे. यात मुलं असतील किंवा स्त्रीया असतील यांचे काय स्थान आहे? किंवा कोणत्या परस्पर संबंधामध्ये आपण बघत आहोत. याची चर्चा करणारा हा लघुपट असल्याचे, नीरज यांनी सांगितले.
मुळात गोष्ट म्हणून आम्ही या लघुपटाकडे बघतो. महत्त्वाच्या विषयावर भाष्य करतो असे काही आम्ही करत नाही आहोत. एका प्रसंगात सापडलेल्या चार वेगवेगळ्या व्यक्तीरेखांची ही गोष्ट आहे. पुढे एका टप्प्यापर्यंत ही गोष्ट येऊन पोहोचते आणि हा टप्पा फिल्म बनवताना आम्ही ओपन ठेवलेला आहे. यातून अनेक प्रश्न प्रेक्षकांना उद्भवू शकतात. लोकांनी हा लघुपट बघावा आणि जे प्रश्न निर्माण होतील त्यावर जरूर चर्चा व्हावी, असेही नारकर म्हणाले.
निखील नारकर, निर्माता 'देवी' लघुपट 'देवी' आपण कुणाला म्हणावं?, एका मुलीवर शारिरीक अत्याचार झाल्यानंतर देवीचा काय रोल आहे. हे त्या मुलीने आपल्या डोळ्यांतून सांगावं आणि हावभावातून ते कळावं, अशी देवी या लघुपटाची कथा आहे. देवीची कथा वास्तव प्रसंगावर आधारित आहे. पण, ते प्रसंग जसेच्या तसे आहेत असे नाही. पण, आम्ही जे अनुभवलं, पाहिलं आहे, ते लघुपटाच्या माध्यमातून समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे, असे निर्माता निखिल नारकर यांनी सांगितले. छोट्या गावात एखाद्या दंगलीनंतर काय काय घडू शकतं आणि लोकांच्या आयुष्यात काय उलथापालथ होऊ शकते, हे दाखवण्याचा प्रयत्न नीरजने केला असल्याचेही त्यांनी सांगितलं.
'देवी' हा १३ मिनीटे ३७ सेकंदांचा लघुपट आहे. यात कृष्णा राजशेखर या उदयोन्मुख अभिनेत्रीने महत्त्वाची भूमिका केली आहे. कोल्हापुरातील नामवंत नाट्यकर्मी किरण खेबुडकर आणि नाना परीट पांगरी या लघुटातील जग्गूची भूमिका साकारलेला अथर्व गुरव यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत. लिंगू पाटील, सलील कलमे, सुहास भास्कर यांच्याही यात भूमिका आहेत.
शिरीष चौसाळकर यांनी ध्वनी संकलन आणि व्ही. एच. रामकृष्णन यांनी संकलन केले असून सुमन साहू यांनी छायाचित्रण केलंय. निखील नारकर याचे निर्माता आहेत, तर अमृता वाळिंबे, दीपिका पुरी आणि अमित नारकर सहनिर्माते आहेत. क्रिएटीव्ही प्रोड्युसर म्हणून अनन्या परीख यांनी काम पाहिलंय.