मुंबई -सोनीच्या 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा अनादर झाल्याप्रकरणी बराच वाद झाला. हे प्रकरण ताजं असतानाच दुसरीकडे मात्र, सोनी समूहाच्या 'सोनी मराठी' या वाहिनीवर सुरू असलेल्या 'स्वराज्यजननी जिजामाता' या मालिकेच्या वतीने राजमाता जिजाऊंना अनोखी मानवंदना देण्यात आली आहे.
'स्वराज्यजननी जिजामाता' या मालिकेत आता त्या ऐतिहासिक सप्तपदीची चाहुल लागली आहे. या मालिकेत आता जिजा-शहाजींचा शाही विवाह सोहळा पाहता येणार आहे. या विवाहाचा प्रत्येक विधी या मालिकेत दाखवण्यात येणार आहे.
ऐतिहासिक सप्तपदीपूर्वी जिजाऊंना अनोखी मानवंदना या विवाह सोहळ्याचे सोनेरी क्षण मनात साठवत असतानाच 'सोनी मराठी'ने एक अनोखा उपक्रम राबवला आहे. रयतेचा राजा घडवणारी राजमाता जिजाऊ जिथे जन्मली, खेळली-बागडली, जिथे जिजाऊ आणि शहाजींच्या विवाहाची बोलणी झाली त्या बुलढाण्यातल्या सिंदखेडमध्ये असणाऱ्या जिजाऊंच्या मुर्तीला सोनी मराठीकडून मनमोहक फुलांची सुंदर अशी आरास करण्यात आली आहे.
ऐतिहासिक सप्तपदीपूर्वी जिजाऊंना अनोखी मानवंदना 'सोनी मराठी'तर्फे जिजाऊंना ही मानवंदना देण्यात आली आहे. हा उपक्रम राबवून महाराष्ट्राच्या त्या थोर मातेविषयी 'सोनी मराठी'ने आपला आदर व्यक्त केला आहे. या मालिकेत सप्तपदीचे क्षण जसे जवळ येऊ लागले, तशी प्रेक्षकांची उत्सुकता वाढत आहे.
ऐतिहासिक सप्तपदीपूर्वी जिजाऊंना अनोखी मानवंदना जिजाऊच्या आयुष्यावर आधारित ही मालिका सुरू झाल्यापासूनच चर्चेत आहे. स्वराज्याचा विचार ज्या माऊलीच्या डोक्यात सर्वप्रथम आला, त्या
जिजाऊंची ही गाथा प्रेक्षकांची पकड घेण्यात यशस्वी ठरली आहे. जिजा आणि शहाजी यांच्या या शाही विवाहानंतर आता प्रेक्षकांना शिवजन्माचे वेध लागले आहेत.