मुंबई -अभिनेता सोनू सूदने परप्रांतिय मजुरांना त्यांच्या घरी परण्यासाठी मदतीचा मोठा हात पुढे कोलाय. यामुळे अनेक मजुर त्यांच्या घरी कुटुंबीयांना भेटू शकणार आहेत. अशावेळी एका यूजरने त्याला आपल्या बिहारमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची भेट घडवून आणण्याची विनंती केलीय. त्याच्या या प्रश्नाला सोनूनेही मिश्किल उत्तर दिले आहे.
मंगळवारी एका ट्विटर युजरने सोनू सूदला लिहिले, ''भैय्या, गर्लफ्रेंडची भेट घवून आणा. बिहारला जायाचं आहे.'' याला उत्तर देताना सोनूने लिहिलंय, ''थोडे दिवस दूर राहून बघ भाऊ, खऱ्या प्रेमाची परिक्षाही होऊन जाईल.'' सोनू सूद सध्या परप्रांतिय मजुरांना घरी परत जाण्यासाठी मोठी मदत करीत आहे. त्याच्या या कार्याची दखल सर्व मीडियाने गेतली आहे. त्याचे कौतुकही सर्वत्र होत आहे.