मुंबईःअभिनेता सोनू सूद याचे प्रवासी मजूरांसाठी अजूनही अथक प्रयत्न सुरू आहेत. हजारो मजूरांना लॉकडाऊनमध्ये घरी सुखरुप पोहोचवल्यानंतर सोनूने आपले लक्ष मजूरांच्या रोजगाराकडेही वळवले आहे. त्याने नोएडा येथे २० हजार मजूरांसाठी राहण्याची व्यवस्था उभारली आहे. त्याने ही बातमी आपल्या इन्स्टाग्रामवर दिली आहे.
प्रवासी रोजगार या माध्यमातून मजूरांसाठी या भागातील कपड्यांच्या कारखान्यांमध्ये नोकरी उपलब्ध करुन देण्यात आली असल्याचेही त्याने सांगितले आहे.
“मला आता २० हजार स्थलांतरित कामगारांना राहण्याची सोय करण्याची संधी मिळाल्याचा आनंद होत आहे, तसेच ज्यांना नोएडा येथील गारमेंट युनिटमध्ये प्रवासी रोजगारमार्फत नोकरी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
लॉकडाऊन दरम्यान प्रवासी मजूरांच्या वाहतुकीची व्यवस्था करण्यासाठी आणि अडकलेल्या कामगारांशी संपर्क साधण्यासाठी एक टोल फ्री नंबर व व्हॉट्सअॅप हेल्पलाईन सुरू केली होती.
देशभरातील विविध क्षेत्रात नोकरीच्या संधी शोधण्यासाठी व कामगारांना पाठिंबा देण्यासाठी सोनू सूदने नुकतेच एक अॅप सुरू केले आहे.