मुंबई -अभिनेत्री सोनम कपूर आणि दुलकर सलमान यांचा 'झोया फॅक्टर' हा चित्रपट सध्या प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. आगळा वेगळा विषय घेऊन 'झोया फॅक्टर' चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला आहे. त्यानंतर या चित्रपटाचं 'लकी चार्म' हे गाणंदेखील प्रदर्शित झालं. आता दुलकर आणि सोनमची रोमॅन्टिक केमेस्ट्री असलेलं गाणं देखील रिलीज करण्यात आलं आहे.
सोनमने सोशल मीडियावर या गाण्याची लिंक शेअर केली आहे. 'मान्सुनमध्ये प्रेमाचे रंग भरण्यासाठी झोया फॅक्टरचं गाणं', असं कॅप्शन तिने या पोस्टवर दिले आहे.
अरिजीत सिंग आणि अलेसा मेंडोसा यांनी हे गाणं गायलं आहे. तर, अमिताभ भट्टाचार्य यांना या गाण्याचे बोल लिहिले आहेत.
हेही वाचा-करण देओलच्या सिनेमाबद्दल सलमानने केले ट्विट, सनी देओलने दिले उत्तर