मुंबई -बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि गोल्डी बेहल यांच्या लग्नाला १७ वर्षे पूर्ण झाली आहेत. सोनालीने त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आपल्या पतीसाठी एक भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. तिच्या कर्करोगाच्या उपचारादरम्यान सोनालीच्या पतीने तिला कशाप्रकारे मानसिक आधार दिला, हे तिने या पोस्टमध्ये लिहिले आहे.
सोनालीला कर्करोगाचं निदान झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांना फार मोठा धक्का बसला होता. तिच्या उपचारासाठी सोनालीला न्यूयॉर्क येथे रवाना करण्यात आले होते. या कठीण वेळी तिचे पती गोल्डी बेहल यांनी तिला भरभक्कम पाठिंबा दिला. सोशल मीडियावर तिने आपल्या पतीसोबतचा फोटो शेअर करून आपल्या भावनांना वाट मोकळी केली.
हेही वाचा -आयुष्मान खुरानाच्या 'बाला'ची घोडदौड, जाणून घ्या आत्तापर्यंतची कमाई
'गेल्या वर्षी याच दिवशी आम्ही न्यूयॉर्कमधील एका रुग्णालयात होतो. तेव्हापासून बेंद्रे आणि बहल यांनी दोन काळ पाहिले. एक म्हणजे 'बीसी' (बीफोर कॅन्सर म्हणजेच कॅन्सरपूर्वीचा) आणि दुसरा म्हणजे 'एसी' (आफ्टर कॅन्सर म्हणजेच कॅन्सर नंतरचा). त्यानंतर मी लक्ष काही दुसऱ्या गोष्टींवर केंद्रीत करण्यास त्या गोष्टींमध्ये हात आजमावण्यास सुरुवात केली. पुनरुज्जीवनाकडे मी जास्त भर दिला'', असं लिहित तिने लग्नाच्या १७व्या वाढदिवसानिमित्त एका अनोख्या आणि अविस्मरणीय प्रवासाची आपण निवड केल्याचं स्पष्ट केलं.
कर्करोगाचं निदान होण्यापूर्वी त्याने अशा कोणत्याच गोष्टी केल्या नव्हत्या. असं म्हणत सध्याच्या घडीला त्याच्यामध्ये झालेल्या बदलाचं तिने स्वागत केलं. पती आपल्याला अधिक जपत असल्याचं म्हणत आपणही त्याला वेळ देऊ शकत असल्याचं तिने या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
हेही वाचा -...म्हणून 'सूर्यवंशी'च्या सेटवर अक्षयचा रोहितसोबत वाद, करण जोहरलाही मध्यस्ती अवघड