मुंबई -बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रेला मागच्या वर्षी हाय ग्रेड कॅन्सरचे निदान झाले होते. तिच्यावर न्युयॉर्कमध्ये उपचार करण्यात आले. कॅन्सरदरम्यान सोनालीला केमोच्या चक्रांना सामोरे जावे लागले. त्यासाठी तिला तिचे सुंदर केस कापावे लागले होते. मात्र, सोनालीने खंबीरपणे कॅन्सरशी झुंज दिली. आता उपचारानंतर ती भारतात परतली आहे. तिने आता तिचा मेकओव्हर केला आहे. उपचारानंतर पहिल्यांदाच ती स्वत:चा नवा लूक पाहून थक्क झाली.
कॅन्सरच्या उपचारानंतर सोनाली बेंद्रेचा मेकओव्हर, शेअर केली खास पोस्ट - cancer
सोनालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये तिचा नवा लूक पाहायला मिळतो. अमेरिकेत उपचार घेण्यासाठी ज्या व्यक्तीने तिचे केस कापले होते, त्याच व्यक्तीने तिला हे नवे रुप दिले आहे.
सोनालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये तिचा नवा लूक पाहायला मिळतो. अमेरिकेत उपचार घेण्यासाठी ज्या व्यक्तीने तिचे केस कापले होते, त्याच व्यक्तीने तिला हे नवे रुप दिले आहे. तोमोहिरो असे या मेकअप आर्टीस्टचे नाव आहे. सोनालीसाठी तो खास भारतात आला होता.
या व्हिडिओमध्ये सोनाली काही क्षणी भावूकही झाल्याचं दिसते. आनंद, वेदना, समाधान, असे संमिश्र भाव तिच्या चेहऱ्यावरून स्पष्टपणे झळकत आहेत. सोनाली या नव्या रूपात
अमेरिकेतही उपचार घेत असताना तिने तिचा हा कॅन्सरचा प्रवास चाहत्यांसमोर उलगडला. आता भारतात परतल्यावर तिने पुन्हा एकदा कामाला सुरुवात केली आहे. कॅन्सरग्रस्तांसाठीही ती प्रेरणा बनली. सोशल मीडियावर ती नेहमी सकारात्मक पोस्ट शेअर करून इतरांना प्रेरणा देताना दिसते.