मुंबई - अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने आपल्या वाढदिवसाच्या शुभ मुहूर्तावर आपल्या फॅन्सना एक गोड बातमी दिली आहे. कुणाल बेनोडेकर या व्यवसायिकाशी 2 फेब्रुवारी रोजी आपला साखरपुडा पार पडला असून लवकरच आपण त्याच्याशी लग्न करणार असल्याचे तिने सोशल मीडियाद्वारे जाहीर केलं आहे. अशा या कुणालविषयी अधिक जाणून घेण्यासाठी जरूर वाचा.
मराठी अप्सरा सोनालीला मोहित करण्यात कुणाल बेनोडेकरने बाजी मारली आहे. त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात ती कशी अडकली याबद्दल ते लवकरच स्पष्टता देईल. मात्र तिला आपल्या मोहजाळात अडकवणारा कुणाल आहे तरी कोण असा प्रश्न पडतो. तो फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित नाही. तो मॉडेल अथवा खेळाडूही नाही. मग सोनाली आणि त्याच्यात एकत्र येण्यासारखा कोणता समान धागा आहे, असा प्रश्न पडू शकतो. त्याचे उत्तर आहे कुणाल हा उच्चशिक्षित मराठी पोरगा आहे.