महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'पवार' प्ले शिवाय जिंकता येत नाही - सोनाली कुलकर्णी - sonalee kulkarni twit on maharashtra politics

सत्तास्थापनेचा पेच असा तडकाफडकी सुटल्याने राजकिय क्षेत्रासोबतच कलाविश्वातही चर्चा पाहायला मिळत आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिनेदेखील ट्विटरच्या माध्यमातून आपलं मत व्यक्त केलं आहे.

'पवार' प्ले शिवाय जिंकता येत नाही - सोनाली कुलकर्णी

By

Published : Nov 23, 2019, 3:08 PM IST

मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळीच दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मागील बऱ्याच दिवसांपासून राज्यात सत्तानाट्य सुरू होते. या सत्तास्थापनेचा पेच असा तडकाफडकी सुटल्याने राजकिय क्षेत्रासोबतच कलाविश्वातही चर्चा पाहायला मिळत आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिनेदेखील ट्विटरच्या माध्यमातून आपलं मत व्यक्त केलं आहे.

सोनालीने तिच्या ट्विटमध्ये लिहिलंय, का ''पवार’ play शिवाय जिंकता येत नाही....

असं दिसतंय... क्रिकेट वर्ल्डकप फायनल काय नाही तर #महाराष्ट्रविधानसभानिवडणूक काय पण या राजकीय ड्रामा चा ‘पवार’full end झाला आहे का नाही अजून, काय वाटतंय?', असं तिने ट्विट केलं आहे.

हेही वाचा -आज महाराष्ट्र पॅटर्न रिलिज झाला - प्रविण तरडे


तिच्या या ट्विटनंतर त्यावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया देखील आल्या. तिच्या या ट्विटवरुन एका युजरने 'तुम्ही खूप इंटरेस्ट दाखवताहेत #पुन्हांनिवडणूक आता हे आपली image वेगळी आहे ती या राजकारणात आणून खराब करू नका', असा टोला मारला.

मात्र, सोनालीने या ट्विटवरही आपलं सडेतोड उत्तर दिलं. 'का? कलाकार हे या राज्याजे नागरिक नसतात का? आम्हाला राज्यात काय चालू आहे यात इंटरेस्ट का नसावा? आणि त्यावर मत का मांडू नये? ', असे उत्तर देत तिने आपलं स्पष्ट मत व्यक्त केलं.
काही दिवसांपूर्वीच तिने #पुन्हानिवडणूक अशा आशयाचे ट्विट केले होते.त्यामुळे सोशल मीडियावर काही युजर्सनी त्यांना ट्रोल केले होते. मात्र, आगामी चित्रपट 'धुरळा'मध्ये सोनालीची भूमिका पाहायला मिळणार आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मराठी कलाकारांनी हा हॅशटॅग वापरून ट्विट केले होते.

हेही वाचा -ते पुन्हा आले ! देवेंद्र फडणवीसांचे ट्विटर स्टेटस बदलले

ABOUT THE AUTHOR

...view details