महाराष्ट्र

maharashtra

सोनाक्षी सिन्हाचा भाऊ बिहार निवडणुकीच्या मैदानात

By

Published : Oct 17, 2020, 6:51 PM IST

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा भाऊ लव्ह सिन्हा याने काँग्रेसच्या वतीने उमेद्वारी अर्ज दाखल केला आहे. पाटण्यातून तो विधानसभेची निवडणूक लढवत आहे. सोनाक्षीने आपल्या मोठ्या भावाला विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Sonakshi Sinha's brother
सोनाक्षी सिन्हाचा भाऊ

मुंबई- अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने शनिवारी आपला भाऊ लव सिन्हा याला राजकीय कारकिर्दीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. बिहारमधील आगामी निवडणुका लव कॉंग्रेसच्या तिकिटावर पाटणा येथून लढवणार आहे. सोनाक्षीने आई पूनम सिन्हा आणि कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांसह इन्स्टाग्रामवर लवचा एक फोटो शेअर केला आहे.

फोटोच्या कॅप्शनमध्ये सोनाक्षीने लिहिलंय, "बिहार निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या माझ्या मोठ्या भावाचा लव सिन्हाचा मला अभिमान आहे. आपल्याला युवकांची आणि चांगल्या माणसांची आवश्यकता आहे, जे आपल्या देशासाठी चांगली पाऊले टाकतील आणि या प्रवासात सामील होण्याचा त्याला आनंद मिळो. ऑल द बेस्ट भैय्या."

अजय देवगण याची मुख्य भूमिका असलेल्या 'भुजः द प्राइड ऑफ इंडिया' या चित्रपटात सोनाक्षी पडद्यावर कम बॅक करणार आहे. या चित्रपटात भारतीय हवाई दलाचे पायलट विजय कर्णिकची कहाणी दाखवण्यात येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details