मुंबई -'फ्रेण्डशिप डे' निमित्त कलाविश्वातून बरेच कलाकार सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करत आहेत. आपल्या मित्र-मैत्रीणींसोबतचे फोटो शेअर करुन चाहत्यांना देखील मैत्रीदिनाच्या शुभेच्छा देत आहेत. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हानेही सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्रीदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यासोबतच तिने एक संदेशही दिला आहे.
'हर एक फ्रेन्ड जरुरी होता है', सोनाक्षीने शेअर केली पोस्ट - दबंग ३
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हानेही सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्रीदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यासोबतच तिने एक संदेशही दिला आहे.
'हर एक फ्रेण्ड जरुरी होता है', सोनाक्षीने शेअर केली पोस्ट
सोनाक्षीने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबतच तिने एक संदेशही लिहिला आहे. 'प्रत्येक मित्र हा गरजेचा असतो. मात्र, आपली गरज पाहणारा मित्र कधी मित्र असू शकत नाही', असे तिने या पोस्टमध्ये लिहिले आहे.
सोनाक्षीचा 'खानदानी शफाखाना' हा चित्रपट २ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला आहे. १५ ऑगस्ट रोजी 'मिशन मंगल' चित्रपटातही ती झळकणार आहे. सलमान खानच्या 'दबंग ३'मधुनही ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.