महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

सैफ अली खानच्या 'लाल कप्तान'मध्ये सोनाक्षीचीही खास झलक, पाहा फोटो - sonakshi sinha news

'लाल कप्तान' चित्रपटाचं दिग्दर्शन नवदीप सिंग हे करत आहेत. तर, आनंद एल. राय हे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. १८ ऑक्टोंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

सैफ अली खानच्या 'लाल कप्तान'मध्ये सोनाक्षीचीही खास झलक, पाहा फोटो

By

Published : Sep 27, 2019, 11:15 AM IST

मुंबई -बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या 'लाल कप्तान'चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये सैफची नागा साधुच्या भूमिकेतील झलक पाहायला मिळाली. या चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहे. आता यामध्ये अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचीही खास भूमिका पाहायला मिळणार आहे. नुकताच तिचा या चित्रपटातील लूक सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

सोनाक्षीची अगदी छोटी भूमिका या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी तिचा लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हेही वाचा -नागा साधूच्या भूमिकेतील सैफ अलीच्या 'लाल कप्तान'ची नवी झलक

'लाल कप्तान' चित्रपटाचं दिग्दर्शन नवदीप सिंग हे करत आहेत. तर, आनंद एल. राय हे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. १८ ऑक्टोंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

सोनाक्षीने अलिकडेच 'मिशन मंगल' या चित्रपटात भूमिका साकारली होती. तसंच, सलमान खानसोबत ती 'दबंग ३' चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिचा 'खानदानी शफाखाना' हा चित्रपट देखील प्रदर्शित झाला. मात्र, या चित्रपटाला पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, आता ती 'लाल कप्तान' या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकेल.

हेही वाचा -नागा साधूच्या भूमिकेतील सैफ अली खानच्या 'लाल कप्तान'चा ट्रेलर प्रदर्शित

ABOUT THE AUTHOR

...view details