महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

रामायणाच्या प्रश्नावरुन ट्रोल होणाऱ्या सोनाक्षीनं ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर - amitabh bachchan news

रामायणानुसार हनुमानाने कोणासाठी संजीवनी बुटी आणली होती. असा 'केबीसी'तला प्रश्न होता. याला सुग्रीव, लक्ष्मण, राम आणि सिता, असे चार पर्यायही दिले होते

रामायणाच्या प्रश्नावरुन ट्रोल होणाऱ्या सोनाक्षीनं ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर

By

Published : Sep 22, 2019, 12:21 PM IST


मुंबई - सोशल मीडियावर कलाकारांना ट्रोल करणं हे नेहमीचंच झालं आहे. काही कलाकार ट्रोलर्सला उत्तरं देतात. तर, काही मात्र, त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. अलिकडेच अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा देखील नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे. 'कौन बनेगा करोडपती'मध्ये तिने हजेरी लावली होती. दरम्यान तिला रामायणासंबधी एक प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र, सोनाक्षीला त्या प्रश्नाचं उत्तर देता न आल्यानं तिला नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली होती. सोनाक्षीने या ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देत एक ट्विट केलं आहे.

रामायणानुसार हनुमानाने कोणासाठी संजीवनी बुटी आणली होती. असा 'केबीसी'तला प्रश्न होता. याला सुग्रीव, लक्ष्मण, राम आणि सिता, असे चार पर्यायही दिले होते. मात्र, सोनाक्षी मॅडम सिता या पर्यायाचा विचार करु लागल्या. नंतर तिने लाईफलाईन घेऊन या प्रश्नाचं उत्तर दिलं.
नेटकऱ्यांनी तिला नेमकं याच विषयावरुन ट्रोल करण्यास सुरुवात केली. अखेरीस खुद्द सोनाक्षीलासुद्धा यावर व्यक्त व्हावं लागलं.

हेही वाचा -प्रियांका चोप्रा - फरहान खानची रोमॅन्टिक झलक, 'द स्काय ईझ पिंक'चं पहिलं गाणं प्रदर्शित

'रामायणानुसार हनुमान कोणासाठी संजीवनी घेऊन गेले होते?', असा प्रश्न तिच्यापुढे उपस्थित करण्यात आला. याच प्रश्नाचं उत्तर देताना समोर असणाऱ्या पर्यायांपैकी सोनाक्षीने सीता, या पर्यायाला प्राधान्य दिल्याचं पाहायला मिळालं. शेवटी तिने लाईफलाइनची मदत घेतली. परिणामी नेटकऱ्यांनी या बी- टाऊन अभिनेत्रीला तिच्या या विसरभोळेपणावरुन चांगलच निशाण्यावर आणलं.

'माझ्या प्रिय सजग खिल्ली उडवणाऱ्यांनो, मला पायथागोरसचं प्रमेय, मर्चंट ऑफ व्हेनिस, पीरीऑडिक टेबल, मुघल प्रशासकांविषयी आणि इतरही काही गोष्टींविषयी आठवत नाही आहे. मुळात मला काय आठवत नाही हेत आठवत नाही आहे. तुमच्याकडे काहीच काम नसेल, तर यावही मीम्स तयार करा. मला मीम्स फारच आवडतात....', असं सोनाक्षीने या ट्विटमध्ये लिहिलं आहे.

हेही वाचा -सोनाक्षीचे उत्तर ऐकून नेटकरी म्हणताहेत..."हे राम!"

ABOUT THE AUTHOR

...view details