मुंबई -बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका सोना मोहापात्रा पुन्हा एकदा एका ट्विटमुळे चर्चेत आली आहे. #MeeToo मोहिमेद्वारे तिने प्रसिद्ध गायक अनु मलिक यांच्यावर गैरवर्तनाचे आरोप लावले होते. त्यामुळे अनु मलिक यांना बऱ्याच कार्यक्रमातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. आता पुन्हा एकदा अनु मलिक एका कार्यक्रमामुळे सज्ज झाले आहेत. त्यामुळे सोनाने पुन्हा त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
काही महिन्यांपूर्वी #MeeToo मोहिमेद्वारे कलाविश्वातील बऱ्याच दिग्गजांची नावे धक्कादायक रित्या समोर आली होती. यापैकीच एक नाव म्हणजे अनु मलिक. सोना मोहापात्राने त्यांच्यावर गैरवर्तनाचे आरोप लावले होते.