मुंबई -बॉलिवूडचा चॉकलेट बॉय कार्तिक आर्यन आणि सारा अली खान यांची मुख्य जोडी असलेला 'लव्ह आज कल' या चित्रपटाचा ट्रेलर अलिकडेच प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये कार्तिकसोबत आणखी एक अभिनेत्री दिसणार आहे. आरुषी शर्मा असे या अभिनेत्रीचे नाव आहे. आरुषीच्या अभिनयाची दमदार झलक या ट्रेलरमध्ये पाहायला मिळाली. त्यामुळे तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
आरुषीने या चित्रपटापूर्वी रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोणसोबत 'तमाशा' चित्रपटात भूमिका साकारली होती. ध्रुव सेहगल यांच्या यू-ट्यूबवरील शॉर्टफिल्म मध्येही तिची भूमिका होती.
हेही वाचा -सारा - कार्तिकमध्ये नेमकं सुरू तरी काय? 'लव्ह आज कल'च्या ट्रेलर लॉन्च दरम्यान उलगडलं गुपीत
आरुषी सोशल मीडियावर फारशी सक्रिय नाही. २०१५ साली तिने इन्स्टाग्रामवर पदार्पण केलं होतं. मात्र, ती फारच कमी फोटो शेअर करत असते. आता 'लव्ह आज कल' चित्रपटाच्या निमित्ताने ती पुन्हा एकदा सोशल मीडियावर फोटो शेअर करताना दिसत आहे.
आरुषीला प्रवासाची प्रचंड आवड आहे. 'लव्ह आज कल' चित्रपटात ती ९० च्या दशकातील प्रेमकथेची नायिका आहे. कार्तिकच्या बालपणीच्या प्रेयसीच्या रुपात ती दिसणार आहे. ट्रेलरमध्ये दोघांची केमेस्ट्री पाहायला मिळाली. सारा अली खानपेक्षा आरुषीची भूमिका वेगळी आहे.
हेही वाचा - रणबीर कपूरसोबत जमणार श्रध्दा कपूरची जोडी, श्रध्दाचा उत्साह द्विगुणीत
इम्तियाज अली यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. येत्या व्हॅलेन्टाईन डेला म्हणजे १४ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होईल.