महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

सोहा-कुणालच्या नवाबी विवाहसोहळ्याची खास झलक, पाहा व्हिडिओ - Kunal Kemmu news

सोहा आणि कुणाल यांनी बऱ्याच वर्षांच्या रिलेशनशीपनंतर लग्नगाठ बांधली होती. कुणालने सोहाला २००४ साली पॅरीस येथे प्रपोज केले होते. त्यांनंतर वर्षभरातच मुंबई येथे त्यांचा विवाहसोहळा पार पडला.

Soha Ali khan And Kunal Kemmu fifth wedding anniversary, Soha Ali khan And Kunal Kemmu wedding video, Kunal Kemmu wish wedding anniversary to soha, सोहा - कुणालच्या नवाबी विवाहसोहळ्याची झलक, Kunal Kemmu news, Soha Ali khan news
सोहा - कुणालच्या नवाबी विवाहसोहळ्याची खास झलक, पाहा व्हिडिओ

By

Published : Jan 25, 2020, 2:21 PM IST

मुंबई -अभिनेता कुणाल खेमू आणि सोहा अली खान यांच्या लग्नाला आज ५ वर्ष पूर्ण झाली आहेत. दोघांनीही आपल्या लग्नसोहळ्यातील खास क्षण सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांच्या नवाबी विवाहसोहळ्याची झलक पाहायला मिळते.

या व्हिडिओमध्ये सोहा अली खान आणि कुणाल खेमूसोबतच सैफ अली खान, शर्मिला टागोर, करिना कपूर यांचाही लुक पाहायला मिळतो.

कुणाल आणि सोहाने हा व्हिडिओ शेअर करून एकमेकांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच, चाहत्यांनी दिलेल्या प्रतिक्रियांबद्दल आभारही मानले आहेत.

सोहा आणि कुणाल यांनी बऱ्याच वर्षांच्या रिलेशनशीपनंतर लग्नगाठ बांधली होती. कुणालने सोहाला २००४ साली पॅरीस येथे प्रपोज केले होते. त्यांनंतर वर्षभरातच मुंबई येथे त्यांचा विवाहसोहळा पार पडला. आता त्यांना इनाया नावाची मुलगी देखील आहे.

वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर, सोहा अली खान बऱ्याच काळापासून चित्रपटांपासून दुर आहे. तर, कुणाल खेमु हा लवकरच 'मलंग' चित्रपटात झळकणार आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details