मुंबई -अभिनेता शाहिद कपूरचा 'कबिर सिंग' चित्रपट २१ जूनला प्रदर्शित झाला. या चित्रपटाला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २१ कोटींचा गल्ला जमवला आहे. हा चित्रपट शाहिदच्या करिअरमधला सर्वाधिक ओपनिंग करणारा चित्रपट ठरला आहे. असे असले, तरीही बॉलिवूडच्या एका गायिकेने मात्र, या चित्रपटावर आक्षेप घेत आपला राग व्यक्त केला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने या चित्रपटावर चांगलीच टीका केली आहे.
बॉलिवूडमध्ये नेहमी आपल्या वादग्रस्त ट्विटमुळे गायिका सोना मोहापात्रा ही चर्चेत असते. बॉलिवूडच्या बऱ्याच कलाकारांना फैलावर घेत ती त्यांच्याबद्दल ट्विट करत असते. आता शाहिदच्या 'कबिर सिंग' चित्रपटातील भडक दृष्यांवरही तिने आक्षेप घेत ट्विट केले आहे.