महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

‘कोल्हापूर डायरीज’मधून सायली कांबळेचे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण! - Sayali Kamble latest news

इंडियन आयडॉल’ ची फायनलिस्ट सायली कांबळे दुसरी रनर अप विजेती ठरली. हा अंतिम सोहळा पार पडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तिला मराठी सिने्मासाठी पारश्वगायन करण्याची संधी मिळाली आहे. फिल्ममेकर जो राजन दिग्दर्शित ‘कोल्हापूर डायरीज’ ह्या चित्रपटासाठी सायलीने नुकतेच गाणे गायले जे लवकरच गायत्री दातार आणि भुषण पाटील यांच्यावर चित्रीत होणार आहे.

सायली कांबळेचे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण!
सायली कांबळेचे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण!

By

Published : Aug 18, 2021, 11:02 PM IST

सांगीतिक रियालिटी शो इंडियन आयडॉल चे १२ वे पर्व नुकतेच संपन्न झाले. तब्बल ८ महिने चाललेल्या या रियालिटी शोच्या फायनलमध्ये उत्तराखंडचा पवनदीप राजन पहिला आला तर कोलकाताची अरुणिता कांजीलालने दुसरा नंबर पटकावला. महाराष्ट्राची सायली कांबळेने तिसरे स्थान पटकावले. खरंतर या शोची नेहमीच ख्याती राहिलेली आहे की ज्या फायनॅलिस्टसना विजयाची ट्रॉफी मिळत नाही ते संगीतक्षेत्रात पुढे उंच स्थानावर पोहोचतात. उदाहरणार्थ या पर्वाची परीक्षक म्हणून काम केलेली नेहा कक्करचे उदाहरणच घ्या. नेहा सुद्धा इंडियन आयडॉल ची फायनॅलिस्ट होती परंतु तिने ती स्पर्धा जिंकली नव्हती. आजच्या घडीला नेहा चित्रपटसृष्टीत आघाडीची पार्श्वगायिका असून ती त्याच कार्यक्रमात आता परीक्षकाच्या खुर्चीत बसते. असो.

सायली कांबळेचे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण

मराठमोळी सायली कांबळे अप्रतिम गायिका असून तिला आशा भोसलेची गाणी गायला जास्त आवडतात. तिने इंडियन आयडॉलमध्ये दरवेळी अप्रतिम गायकी त्यातील बारकाव्यांसह सादर केली आणि आशा भोसले यांनीदेखील तिच्या गायनाची मुक्तकंठाने स्तुती केली होती. संगीतकार आनंदजी यांनी तिचे नामकरण सायली किशोर असे केले आणि ती आता, कदाचित, तेच नाव वापरेल. शो मध्ये तिसऱ्या स्थानावर आलेल्या सायलीचे नशीब लगेचच फळफळू लागले आहे. शो संपल्या संपल्या सायलीला मराठी चित्रपटासाठी पार्श्वगायनाची संधी मिळाली आहे. निर्माते जो राजन ह्यांच्या ‘कोल्हापूर डायरीज’ फिल्मव्दारे सायली कांबळेने सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे.

इंडियन आयडलच्या बाराव्या पर्वाचे व्यासपीठ गाजवून आपल्या सुरेल स्वरांनी करोडो हृदयांवर अधिराज्य गाजवणारी गायिका सायली कांबळेच्या स्वप्नवत प्रवासाला आता सुरूवात झालीय. सायलीचे इंडियन आयडल संपताना सिनेसृष्टीत पदार्पण करायचे स्वप्न पूर्ण झाले. फिल्ममेकर जो राजन दिग्दर्शित ‘कोल्हापूर डायरीज’ ह्या चित्रपटासाठी सायलीने नुकतेच गाणे गायले जे लवकरच गायत्री दातार आणि भुषण पाटील ह्यांच्यावर चित्रीत होणार आहे. जो राजन दिग्दर्शित ‘कोल्हापूर डायरीज’ च्या ह्या गाण्याला अवधूत गुप्तेनी संगीत दिलंय. स्वप्नील बांदोडकर आणि सायली कांबळे ह्यांनी हे रामँटिक गाणं गायलंय.

संगीतकार, गायक, फिल्ममेकर अवधूत गुप्ते म्हणतात, “आमचे दिग्दर्शक जो राजन ह्यांना सायलीचा आवाज खूप आवडला होता. त्यामुळे त्यांनीच मला सायलीचे नाव ह्या गाण्यासाठी सुचवले. ती किती उत्तम गायिका आहे, ते ती दरवेळी सिध्द करते. सायलीच्या रूपाने एक टॅलेंटेड गायिका महाराष्ट्रालाच नाही तर अख्या जगाला मिळालीय, असं मला वाटतं. ”

सायली कांबळेचे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण!
सुमधूर गळ्याची गायिका सायली कांबळे म्हणाले, “इंडियन आयडॉलमध्ये जाण्याचं कारणच हे होतं की लोकांनी मला ओळखावं आणि माझं संगीत क्षेत्रात करीयर सुरू व्हावं. इंडियन आयडॉलचा ग्रँड फिनाले झाल्याझाल्या हातात काम असणं, हे भाग्याचं आहे. मला विश्वासच बसत नाही आहे,की माझं स्वप्न पूर्ण झालंय. लहानपणापासून अवधूत गुप्तेंची मी चाहती आहे. आणि त्यांच्यासोबत मला काम करायची संधी मिळतेय. चित्रपटाचे दिग्दर्शक जो राजन ह्यांनी मला ही संधी दिली ह्याबद्दल मी त्यांची खूप खूप आभारी आहे.”

फिल्ममेकर जो राजन म्हणाले, “सायलीच्या गळ्यात जादु आहे. तिचा इंडियन आयडलचा संगीत प्रवास मी गेले कित्येक महिने पाहिलाय. त्यामुळेच मला तिचा अभिमान आहे. ह्या महाराष्ट्राच्या लाडक्या मुलीला मराठी फिल्मसाठी ब्रेक देताना मला खूप आनंद होतोय.”

हेही वाचा - ‘शेलार मामा फॉउंडेशन’ क्रिकेट लीग : नृत्यदिग्दर्शकसुभाष नकाशे यांचा संघ ठरला विजयी!

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details