महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'एक व्हिलन'च्या जोडीचा पुन्हा एकदा धमाका, 'मरजावां' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित - rakul preet

दिग्दर्शक मिलाप झावेरी हे या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटातही रितेशची नकारात्मक भूमिका आहे. विशेष म्हणजे तो या चित्रपटात कमी उंचीच्या व्यक्तिची भूमिका साकारत आहे.

'एक विलन'च्या जोडीचा पुन्हा एकदा धमाका, 'मरजावां' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

By

Published : Sep 26, 2019, 2:03 PM IST

मुंबई -अभिनेता रितेश देशमुख आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांची जोडी 'मरजावां' चित्रपटातून पुन्हा एकदा एकत्र येत आहे. पाच वर्षांपूर्वी 'एक व्हिलन' या चित्रपटात दोघांची मुख्य भूमिका होती. रितेशने यामध्ये नकारात्मक भूमिका साकारली होती. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटांचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

दिग्दर्शक मिलाप झावेरी हे या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटातही रितेशची नकारात्मक भूमिका आहे. विशेष म्हणजे तो या चित्रपटात कमी उंचीच्या व्यक्तिची भूमिका साकारत आहे.

सिद्धार्थ मल्होत्राचेही वेगवेगळे लूक असलेले पोस्टर याआधी प्रदर्शित झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच तो 'जबरिया जोडी' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाता फारसं यश मिळालं नाही. मात्र, आता पुन्हा एकदा तो 'मरजावां' चित्रपटासाठी सज्ज झाला आहे. अभिनेत्री रकुल प्रित आणि तारा सुतारिया यांचीही या चित्रपटात मुख्य भूमिका आहे.

हेही वाचा -पाहा 'हाऊसफुल'चं नवं पोस्टर, ट्रेलर 'या' दिवशी होणार प्रदर्शित

ताराने अलिकडेच 'स्टूडंट ऑफ द ईयर २' या चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण केलं आहे.
या चित्रपटानंतर सिद्धार्थ 'शेहशाहं' चित्रपटात झळकणार आहे. तर, रितेश देशमुखही 'हाऊसफुल ४'मध्ये मुख्य भूमिकेत पाहायला मिळेल.

हेही वाचा -हृतिक - टायगरच्या 'वॉर'साठी अॅडव्हान्स बुकिंग सुरू

ABOUT THE AUTHOR

...view details