मुंबई -अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि परिणीती चोप्रा यांची जोडी पुन्हा एकदा 'जबरिया जोडी' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटातील सिद्धार्थ आणि परिणीतीचं 'खडके ग्लासी' हे गाणे अलिकडेच प्रदर्शित झाले. आता पुन्हा देसी सेलिब्रेशनसाठी तयार राहा, असे म्हणत सिद्धार्थने नवे गाणे शेअर केले आहे.
'जीला हिलेला' असे या नव्या गाण्याचे बोल आहेत. या गाण्यात सिद्धार्थसोबत पिरिणीती नाही, तर अभिनेत्री एली अवराम हिचा जबरदस्त अंदाज पाहायला मिळतो. या गाण्याला भोजपूरी शब्दांचा तडका लागल्याने हे गाणे सर्वांना ठेका धरायला लावेल, हे नक्की.