महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

सिद्धार्थ-रितेशच्या 'मरजावां' चित्रपटाची तारीख बदलली, 'या' दिवशी होणार प्रदर्शित - रकुल प्रित सिंग

'मै मरुंगा मर जायेगा, दुबारा जनम लेने से डर जायेगा' अशा ओळी असलेलं 'मरजावां'चं नवं पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आलं आहे.

सिद्धार्थ - रितेशच्या 'मरजावां' चित्रपटाची तारीख बदलली, 'या' दिवशी होणार प्रदर्शित

By

Published : Sep 6, 2019, 11:51 AM IST


मुंबई - 'एक विलन' चित्रपटानंतर पुन्हा एकदा अभिनेता रितेश देशमुख आणि सिद्धार्थ मल्होत्रा पडद्यावर एकत्र भूमिका साकारताना दिसणार आहेत. 'मरजावां' असे त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. नुकतंच या चित्रपटाचं नवं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. त्यासोबतच चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवी तारीखही जाहीर करण्यात आली आहे.

'मै मरुंगा मर जायेगा, दुबारा जनम लेने से डर जायेगा' अशा ओळी असलेलं 'मरजावां'चं नवं पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आलं आहे. यामध्ये सिद्धार्थ आणि रितेश दोघांचाही लूक पाहायला मिळतो. रितेश देशमुखच्या लूकवरुन तो या चित्रपटात देखील विलनच्या भूमिकेत झळकणार असल्याचा अंदाज येतो. अभिनेत्री रकुल प्रित सिंग ही देखील या चित्रपट मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

मिलाप मिलन झवेरी हे या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. तर, टी-सीरिझच्या अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. ८ नोव्हेबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

ABOUT THE AUTHOR

...view details