मुंबई- आपल्या सगळ्यांचे लाडके अभिनेते अशोक सराफ यांचा आज 73 वा वाढदिवस आहे. याच निमित्ताने अभिनेता सिद्धार्थ जाधव याने त्यांना आपल्या खास शैलीत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. एरवी सिद्धार्थच्या वाढदिवसाला दरवर्षी अशोक मामा न चुकता त्याला फोन करून शुभेच्छा देतात. त्यामुळे, यावर्षी ही संधी साधायचं सिद्धार्थनं ठरवलं आहे.
अशोक सराफ यांचा 73 वा वाढदिवस, सिद्धार्थ जाधवने दिल्या खास शुभेच्छा - अशोक सराफ यांचा वाढदिवस
लहानपणापासूनच सिध्दार्थ हा अशोक मामांचा मोठा फॅन आहे. अशात अशोक मामांनीदेखील एकदा सिद्धार्थचं त्याच्या विनोदाच्या टायमिंगबद्दल कौतुक केलं होतं. हाच किस्सा सिद्धार्थने आज अशोक मामांना शुभेच्छा देण्यासाठी तयार केलेल्या खास व्हिडीओमध्ये सांगितला आहे.
लहानपणापासूनच सिध्दार्थ हा अशोक मामांचा मोठा फॅन आहे. त्यांचे आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचे अनेक हिट सिनेमे पाहून विनोदाचं टायमिंग शिकण्याचा प्रयत्न केल्याचं सिद्धार्थने स्वतः सांगितलं आहे. अशात अशोक मामांनीदेखील एकदा सिद्धार्थचं त्याच्या विनोदाच्या टायमिंगबद्दल कौतुक केलं होतं. हाच किस्सा सिद्धार्थने आज अशोक मामांना शुभेच्छा देण्यासाठी तयार केलेल्या खास व्हिडीओमध्ये सांगितला आहे. चला तर मग आपणही पाहूयात या 'बटरफ्लाय मॅन'ने अशोक मामांना नक्की काय शुभेच्छा दिल्या आहेत.