महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

ब्राव्हो आणि पोलार्डच्या गाण्यावर अमेय - सिद्धार्थचा धमाल डान्स, पाहा व्हिडिओ - dhurala

'जेव्हा धुरळाच्या शूटिंगदरम्यान माझ्या आणि सिद्धार्थच्या अंगात ब्राव्हो आणि पोलार्ड संचारले', असं कॅप्शन देऊन अमेयने हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांचा धमाल डान्स पाहुन कोणालाही हसू अनावर होईल.

Siddharth Jadhav, Amey Wagh dance on bravo and pollard
ब्राव्हो आणि पोलार्डच्या गाण्यावर अमेय - सिद्धार्थचा धमाल डान्स, पाहा व्हिडिओ

By

Published : Dec 16, 2019, 6:14 PM IST

मुंबई -अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि अमेय वाघ सध्या त्यांच्या 'धुरळा' चित्रपटामुळे चर्चेत आहेत. राजकीय समीकरणांवर आधारित असलेल्या या चित्रपटात मराठीतील आघाडीची स्टारकास्ट झळकणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित झाला आहे. दरम्यान शूटिंगदरम्यान अमेय आणि सिद्धार्थने ब्राव्हो आणि पोलार्डच्या गाण्यावर धमाल डान्स केला होता. अमेयने या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

'जेव्हा धुरळाच्या शूटिंगदरम्यान माझ्या आणि सिद्धार्थच्या अंगात ब्राव्हो आणि पोलार्ड संचारले', असं कॅप्शन देऊन अमेयने हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांचा धमाल डान्स पाहुन कोणालाही हसू अनावर होईल.

हेही वाचा -पुन्हा निवडणूक..! नववर्षाच्या सुरुवातीलाच चित्रपटगृहात उडणार राजकारणाचा 'धुरळा', पाहा ट्रेलर

'धुरळा' हा चित्रपट नववर्षाच्या सुरुवातीलाच सिनेमागृहात येऊन धडकणार आहे. #पुन्हानिवडणूक या हॅशटॅगमुळे 'धुरळा' चित्रपटाबाबत आधीच फार चर्चा झाली होती. गावाकडच्या मातीत मुरलेलं राजकारण, निवडणुकांची रणधुमाळी आणि सत्तेच्या या खेळात एकमेकांवर कुरघोडी करताना उडालेला राजकारणाचा 'धुरळा' हे सगळेच पैलू या ट्रेलरमध्ये उलगडण्यात आले आहेत.

अल्का कुबल, सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी, प्रसाद ओक, अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, उमेश कुलकर्णी, अमेय वाघ हे कलाकार यामध्ये भूमिका साकारत आहे. समीर विद्वांस यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून क्षितीज पटवर्धनने या सिनेमाचं लेखन केलं आहे. ३ जानेवारी २०२० रोजी सिनेमा प्रदर्शित होत आहे.

हेही वाचा -'दिल दोस्ती दुनियादारी'तील 'अ‌ॅना' लवकरच अडकणार लग्नबंधनात

ABOUT THE AUTHOR

...view details