मुंबई- अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आपल्या अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकत असतो. त्याच्या याच अभिनयामुळे केवळ चाहतेच नव्हे तर अनेक कलाकारही नवाजसोबत काम करणे म्हणजे आपले भाग्य समजतात. लवकरच नवाज 'रात अकेली हैं' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री श्वेता त्रिपाठी महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. नवाजुद्दीनसोबत काम करताना खूप काही शिकायला मिळत असल्याचे तिने म्हटले आहे.
नवाजुद्दीनसोबत काम करायला मिळाल्याने स्वतःला भाग्यवान समजते ही अभिनेत्री - nawazuddin
यापूर्वीदेखील नवाजसोबत काम केले असून पहिल्याच चित्रपटात त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाली यासाठी स्वतःला भाग्यवान समजत असल्याचे तिने म्हटले आहे.
यासोबतच यापूर्वीदेखील नवाजसोबत काम केले असून पहिल्याच चित्रपटात त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाली यासाठी स्वतःला भाग्यवान समजत असल्याचे तिने म्हटले आहे. याआधी २०१५ मध्ये आलेल्या 'हरामखोर' या चित्रपटात या दोघांनी स्क्रीन शेअर केली होती.
खरंतर २०१५ मध्येच प्रदर्शित झालेला 'मसान' चित्रपट श्वेताचा पहिला चित्रपट ठरला. मात्र, 'हरामखोर'च्या चित्रीकरणाला आधी सुरूवात झाली असल्याने तोच खऱ्या अर्थाने आपला पहिला चित्रपट असल्याचे श्वेताने म्हटले आहे. 'रात अकेली हैं' चित्रपटाचं चित्रीकरण सध्या कानपूरमध्ये सुरू आहे. या चित्रपटात श्वेताशिवाय राधिका आप्टेदेखील झळकणार आहे. हा एक थ्रिलर चित्रपट असणार असून नवाजुद्दीन यात एका पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे.